Next
श्वेता त्रिपाठी दिसणार तमिळ चित्रपटात
‘मेहंदी सर्कस’ चित्रपटाद्वारे करणार तमिळ चित्रसृष्टीत पदार्पण
BOI
Friday, February 08, 2019 | 06:06 PM
15 0 0
Share this article:

नवी दिल्ली : ‘मसान’ या हिंदी चित्रपटाद्वारे प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री श्वेता त्रिपाठी ‘मेहंदी सर्कस’ या तमिळ चित्रपटाद्वारे ‘तमिळ’ चित्रसृष्टीत पदार्पण करत आहे. दक्षिणेतील सुप्रसिद्ध अभिनेता धनुषने या चित्रपटाबाबत एक ट्विट करत चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. 

‘मेहंदी सर्कस’ हा सर्कस कलाकारांवर आधारित चित्रपट असेल. ज्यामध्ये श्वेता त्रिपाठी ‘मेहंदी’च्या प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटासाठी श्वेताने इतर कलाकारांसोबत काम सुरू केले असून आपण हे काम करताना खूप आनंदी असल्याचे श्वेताने म्हटले आहे. अभिनेता धनुषने या चित्रपटातील एका गाण्याचा व्हिडिओ ट्विट केला असून, आपण ते गाणे पुन्हा पुन्हा ऐकले असल्याचे म्हटले आहे. चित्रपटाच्या संपूर्ण टिमला त्याने शुभेच्छा दिल्या आहेत. 

नुकतेच आपल्या बॉयफ्रेंडसोबत श्वेता लग्नाच्या बंधनात अडकली असून, गोव्यात त्यांचे लग्न झाले. ‘‘मेहंदी सर्कस’ या चित्रपटाबाबत मी खूप उत्सुक आहे. आजवर मी केवळ पुस्तकांमधून सर्कस कलाकारांच्या आयुष्याबद्दल वाचले आहे. त्यांचे आयुष्य खूप जास्त कसरतीचे आणि धोक्याचे असते. आता चित्रपटातील भूमिकेवर काम करत असताना त्यांचे आयुष्य प्रत्यक्ष अनुभवायला मिळत आहे. खरोखर त्यांचे आयुष्य खूप अवघड असते’, अशा शब्दात श्वेताने या चित्रपटाबाबतच्या आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search