Next
‘राष्ट्रवादी’तर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी
प्रेस रिलीज
Monday, April 15, 2019 | 03:52 PM
15 0 0
Share this article:



नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त चिंचोली येथील वस्तुसंग्रहालय येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार प्रकाश गजभिये यांनी तथागत भगवान बुद्ध यांच्या मूर्तीला पुष्प वाहून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी केली. या वेळी मिठाई, लाडू, बुंदी वाटून सर्वांना शुभेच्छा देण्यात आल्या.

‘डॉ. आंबेडकर यांनी १९५६ला धम्म दीक्षा सोहळ्यात वापरलेली खुर्ची, त्यांनी वापरलेले कपडे, जुते, पेन, संविधान लिहिलेले टाइपराइट, काठी, चश्मा, टोपी, अश्या अनेक वस्तू या संग्राहलयात जतन करून ठेवण्यात आल्या आहेत. या वस्तू आंबेडकरी जनतेसाठी ऊर्जास्रोत, प्रेरणादायी आहेत. म्हणून दर वर्षी लाखो अनुयायी दर्शनासाठी चिंचोली येथे येतात,’ असे आमदार गजभिये म्हणाले.



या वेळी सरपंच मीना कोडापे, उपसरपंच शिल्पा चौधरी, हाजी असिफभाई, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष संतोष नरवाडे, विजय गजभिये, वंदना चौधरी, चंद्रकला घोरमाडे, ईश्वर उघडे, सखाराम सिंगारे, किशोर सरोवर, सतीश चौधरी, दिगंबर गोरमाळे, हर्षल चौधरी, रोशन नागपुरे, राकेश सरोवर, प्रकाश कोडापे, रवींद्र चौधरी, अमोल चौधरी, संदीप घोरमाडे, प्रमोद झाडे, अतुल उघडे, राम वैद्य, रवींद्र घरमाडी, अभिनव गजभिये, अविनाश तिरपुडे, गोपी अंभोरे यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते.

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search