Next
इलेक्ट्रिक वाहनसेवेसाठी ‘ओला’ची ४०० कोटींची उभारणी
BOI
Wednesday, March 06, 2019 | 03:47 PM
15 0 0
Share this story


बेंगळुरू : पर्यावरणपूरक वाहनांचा वापर वाढवण्यासाठी सरकारकडून करण्यात येणाऱ्या प्रयत्नांना प्रतिसाद म्हणून आघाडीची ऑनलाइन कॅब सेवा पुरविणाऱ्या ओला कंपनीने प्रवाशांना वाहतूक सेवेसाठी इलेक्ट्रिक वाहने देण्याकरता ४०० कोटी रुपयांच्या निधीची उभारणी केली आहे. ‘ओला’च्या स्थापनेसाठी गुंतवणूक करणाऱ्या टायगर ग्लोबल आणि मॅट्रिक्स इंडिया या कंपन्यांनी ही गुंतवणूक केली आहे. 

‘२०२२ पर्यंत देशात दहा लाख इलेक्ट्रिक वाहने कॅब सेवेसाठी  उपलब्ध करण्याची आमची योजना आहे. आमच्या ‘मिशन इलेक्ट्रिक’चा हा पहिला टप्पा आहे,’ असे कंपनीने म्हटले आहे. नऊ वर्षापूर्वी स्थापन झालेल्या या कंपनीने बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांची सेवा देण्यासाठी २०१८ मध्ये ‘ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेड’ ही कंपनी स्थापन केली आणि नागपूर येथे पथदर्शी प्रकल्प सुरू करण्यात आला. 

‘आम्ही अनेक ठिकाणी इलेक्ट्रिक वाहनांची सेवा देण्याचा प्रकल्प राबवत असून, चार्जिंग सुविधा, इलेक्ट्रिक दुचाकी आणि तिचाकी सेवा देण्याचाही प्रयत्न करत आहोत,’ असेही कंपनीने म्हटले आहे. 

ओलाचे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी भाविश अगरवाल

‘प्रदुषणासारख्या समस्येवर मात करण्यासाठी आणि इंधन बचतीसाठी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर सहजसुलभ व्हावा. प्रत्येकाला शाश्वत, स्वच्छ वाहतूक सुविधा उपलब्ध व्हावी, हे आमचे ध्येय आहे. याद्वारे आर्थिक आणि रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होतील,’ असे ‘ओला’चे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी भाविश अगरवाल यांनी म्हटले आहे. 

‘आम्ही अनेक वाहन उत्पादक कंपन्यांशीही भागीदारी केली असून, इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंगची सुविधा अत्यंत महत्त्वाची ठरते. पेट्रोलपंपाप्रमाणे चार्जिंग स्टेशन्स असणे गरजेचे आहे,’ असेही अगरवाल यांनी सांगितले. 

‘शाश्वत विकासासाठी इलेक्ट्रिक वाहन सेवेचा विस्तार करणे हे ‘ओला’चे ध्येय आहे. त्यांच्या या प्रवासात आम्ही त्यांचे भागीदार आहोत, हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे,’ असे मॅट्रिक्स इंडिया कंपनीचे संस्थापक अविनाश बजाज यांनी सांगितले. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link