Next
नंदुरबारमध्ये ग्रंथोत्सवाचे उद्घाटन
शशिकांत घासकडबी
Tuesday, January 08, 2019 | 02:40 PM
15 0 0
Share this article:

नंदुरबार : शासनाचे ग्रंथालय संचालनालय व नंदुरबार जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय यांच्यातर्फे जुने पोलिस कवायत मैदान येथे दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या ग्रंथोत्सवाचे उद्घाटन आमदार अॅड. के. सी. पाडवी यांनी दीपप्रज्वलनाने केले.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आमदार डॉ. विजयकुमार गावीत यांनी भूषविले. या वेळी जिल्हा परिषद अध्यक्षा रजनी नाईक, जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा पोलिस अधीक्षक संजय पाटील, प्रभारी नगराध्यक्ष परवेज खान, नगरपालिकेच्या माजी उपनगरध्यक्षा डॉ. शोभा मोरे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास नाईक, अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. पितांबर सरोदे, उद्योगपती मनोज रघुवंशी, जिल्हा शिक्षणाधिकारी मच्छिंद्र कदम, पत्रकार रमाकांत पाटील, सूर्यभान राजपूत, योगेंद्र दोरकर, राजेंद्र गावीत, साहित्यिक निंबाजी बागुल, नगरसेवक कुणाल वसावे, रवींद्र पवार, जिल्हा ग्रंथालय अधिकारी संतोष जाधव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

या वेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते जिल्ह्यातील उत्कृष्ट ग्रंथालयांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. यामध्ये लोकमान्य टिळक वाचनालय (नंदुरबार), महात्मा गांधी पुस्तकालय (नवापूर), नुराणी सार्वजनिक वाचनालय (शहादा), बाजीराव खतऱ्या तडवी सार्वजनिक वाचनालय व डी. आर. शाळेच्या पथकाचाही या वेळी प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. या प्रसंगी हेमलता पाटील यांनी लिहिलेल्या ‘असेलही नसेलही’ या मराठी गजल पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

प्रारंभी श्रीमती दुर्गाबाई रघुवंशी विद्यालयातून ग्रंथदिंडी काढण्यात आली. या वेळी ग्रंथांनी सजवलेल्या ग्रंथदिंडीचे उपनगराध्यक्षा शोभा मोरे, नगराध्यक्ष परवेज खान व जिल्हाधिकारी डॉ. कलशेट्टी यांनी ग्रंथ पूजन करून दिंडीस शुभारंभ केला. ही दिंडी जिल्हाधिकारी डॉ. कलशेट्टी व नगराध्यक्ष परवेज खान यांनी खांद्यावर घेऊन टाळ- मृदंगाच्या गजरात कार्यक्रमस्थळी आणली. या दिंडीत सर्व मान्यवर सहभागी झाले होते.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search