Next
‘स्टँडर्ड चार्टर्ड’तर्फे भारतात ‘एसएमई’ डिजिटल व्यासपीठ
प्रेस रिलीज
Saturday, March 16, 2019 | 05:16 PM
15 0 0
Share this story

नवी दिल्ली : स्टँडर्ड चार्टर्ड बँकेने भारतातील लहान व मध्यम कंपन्यांसाठी (एसएमई) एक व्यासपीठ सुरू करण्याची घोषणा नुकतीच केली आहे. हे व्यासपीठ ‘एसएमईं’ना वित्तीय व व्यवसायविषयक सेवा देऊन त्यांना प्रगती करण्यासाठी मदत करणार आहे. एससी व्हेंचर्स या स्टँडर्ड चार्टर्डच्या नाविन्यपूर्ण, गुंतवणूक व व्हेंचर्स युनिट अंतर्गत दाखल करण्यात आलेले वैशिष्ट्यपूर्ण बिझनेस व्हेंचर आहे.

जीडीपीमध्ये अंदाजे ३० टक्के व निर्यातीमध्ये अंदाजे ४५ टक्के योगदान देणाऱ्या भारतातील ‘एसएमईं’ना सर्वांगीण सुविधा देणाऱ्या सुरुवातीच्या काही तंत्रज्ञानविषयक व्यासपीठांपैकी एक असणार आहे. डाटा सोर्सेसच्या झपाट्याने वाढत्या व्यवस्थेचा लाभ हे व्यासपीठ घेणार आहे आणि त्याचे एकात्मिकरण डिजिटल बिझनेस सेवा देणाऱ्यांशी करणार आहे. या सेवांमध्ये, व्यवसाय कर्जाची उपलब्धता, इनव्हॉइस/सप्लाय चेन फायनान्सिंग, लॉजिस्टिक्स, कमर्शिअल इन्शुरन्स आणि कुशल संसाधने यांचा समावेश असणार आहे. हे व्यासपीठ ‘एसएमईं’ना आर्टिफिशिअल इंटलिजन्स व मशीन लर्निंग यांच्या सहाय्याने पूर्णतः डिजिटल सेवा देणार आहे. तंत्रज्ञान कंपनीची स्थापन बेंगळुरूमध्ये करण्यात आली. नितीन मित्तल यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी या पदी करण्यात आली आहे.

डिजिटल क्लाएंट संदर्भातील डाटाची चाचणी पूर्ण झाली आहे आणि हे व्यासपीठ २०१९ वर्षातील दुसऱ्या तिमाहीत पहिला व्यवहार पार पाडेल. व्यासपीठ दाखल करताना वित्तपुरवठ्यासाठी स्टँडर्ड चार्टर्ड इन्व्हेस्टमेंट्स अँड लोन्स लिमिटेड (एससीआयएलएल) या नॉन-बँकिंग वित्तीय कंपनीशी भागीदारी केली जाणार आहे. एक खुले व्यासपीठ म्हणून, ते अन्य वित्तीय संस्थांशी व आघाडीच्या मल्टि-चॅनल मार्केटशीही एकात्मिक होणार आहे. २०१९च्या उत्तरार्धात हे व्यासपीठ भारतातील ग्राहकांसाठी उपलब्ध होईल.

भारतातील स्टँडर्ड चार्टर्ड बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी झरिन दारूवाला म्हणाले, ‘लाखो ‘एसएमईं’ना पूर्ण क्षमतेने काम करणे शक्य होण्यासाठी पाठबळ देण्याच्या दृष्टीने भारतात प्रचंड संधी आहे. या व्यासपीठामुळे पूर्णतः निराळ्या मॉडेलद्वारे ‘एसएमईं’च्या विविध गरजा पूर्ण केल्या जाणार आहेत. या मॉडेलमुळे ‘एसएमईं’च्या प्रगतीचा मार्ग सुकर होईल व त्यांना त्यावर सुलभ नियंत्रणही ठेवता येईल.’

एससी व्हेचर्सचे जागतिक प्रमुख अॅलेक्स मॅन्सन म्हणाले, ‘या संदर्भात, बँकिंगमधील डीएनएला नवसंजीवनी देणे, हा विचार केंद्रस्थानी आहे. या व्हेंचरमुळे एका खुल्या व्यासपीठाचा पाया रचला जाणार असून, त्याचा प्रामुख्याने भर भागीदारी, तंत्रज्ञान व डाटाचा लाभ आणि ‘एसएमई’ समुदाय यांच्या पाठिंब्यावर असणार आहे.’   

स्टँडर्ड चार्टर्ड बँकिंग क्षेत्रामध्ये नाविन्य आणत आहे, ग्राहकांना चांगली सेवा मिळण्यासाठी सेवांची सह-निर्मिती करत आहे आणि बँकिंगविषयीचा दृष्टिकोन व विचार बदलण्यासाठी नव्या भागीदारी व सुविधा निर्माण करत आहे. स्टँडर्ड चार्टर्डने उद्योजकता व नाविन्य यांना चालना देण्यासाठी, फिनटेकमध्ये गुंतवणूक करण्यासाठी व वैविध्यपूर्ण व्हेंचर्सची निर्मिती करण्यासाठी एससी व्हेंचर्स हे बिझनेस युनिट स्थापन केले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link