Next
कलानुभूती चित्र प्रदर्शन
प्रेस रिलीज
Friday, March 16 | 02:40 PM
15 0 0
Share this story

पुणे : नवोदित कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, तसेच होतकरू आणि छंद म्हणून चित्रकला जोपासणाऱ्या कलाकारांना आपली कला सादर करायला संधी मिळावी, यासाठी ‘इव्हेंट हाऊस एंटरटेनमेंट’तर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘कलानुभूती’ चित्रकला प्रदर्शन व स्पर्धेला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.  

चित्रकला स्पर्धेत चेतना कुमारी यांच्या ‘ट्युलिप्स’ या चित्राला प्रथम पारितोषिक मिळाले, तर श्रुती कोष्टी यांना द्वितीय आणि रवि पिल्ले यांना तृतीय पारितोषिक मिळाले.

पारितोषिक विजेते चित्रकारनव्वदहून अधिक नवोदित कलाकारांनी काढलेल्या, व्यक्तिचित्र, निसर्गचित्र, अॅबस्ट्रॅक्ट, स्टिल लाइफ अशा वेगवेगळ्या श्रेणीमधील तब्बल दीडशे चित्रांची कलानुभूती घेण्याची संधी पुणेकरांना मिळाली. कलानुभूती प्रदर्शनासाठी केवळ पुणे आणि महाराष्ट्रातूनच नव्हे, तर कर्नाटक, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, बंगाल, आसाम, हिमाचलप्रदेश, दिल्ली आणि इतर राज्यांतून कलाकारांनी साधारण चारशे चित्रं संस्थेकडे पाठविली होती. त्यातील निवडक दीडशे चित्रं प्रदर्शित करण्यात आली. याचबरोबर ‘अब नॉर्मल होम’ संस्थेतील ‘विशेष मुलांनी’ काढलेली चित्रेदेखील या प्रदर्शनात पहायला मिळाली. 

पेन्सिल चित्रकार सुरेश बापट आणि चित्रकार सचिन नाईक यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. बक्षीस वितरण चित्रकार कुमावत सर यांच्या हस्ते झाले. या वेळी आयोजक हृषीकेश पटवर्धन आणि मिहीर कारखानीस उपस्थित होते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link