Next
‘अॅक्सिस’तर्फे तत्क्षण क्रेडिट कार्डची सुविधा उपलब्ध
प्रेस रिलीज
Tuesday, September 18, 2018 | 03:12 PM
15 0 0
Share this story

मुंबई : अॅक्सिस बॅंकेने आपल्या पूर्वमंजूरी असलेल्या ग्राहकांसाठी तत्क्षण क्रेडिट कार्डची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. संबंधित ग्राहकांना आपली ओळख सिद्ध केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये अॅक्सिस पे मोबाइल अॅपद्वारे डिजिटल पद्धतीने तत्क्षण व्हर्च्युअल क्रेडिट कार्ड मिळणार आहे.

अॅक्सिस बॅंकेचे कार्यकारी उपाध्यक्ष आणि कार्ड्स अॅंड मर्चंट व्यवसायाचे प्रमुख संजीव मोघे म्हणाले, ‘ग्राहकांना चांगली सेवासुविधा पुरविण्यासाठी तसेच नवनवीन प्रॉडक्ट्स उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही बांधील आहोत. या प्रक्रियेमुळे बॅंकिंग सेवेचा वेग वाढणार आहे. आमच्या असे पाहण्यात आले आहे की सध्याच्या ई-बॅंकिंगवरील ७० टक्के व्यवहार हे मोबाइलद्वारे केले जातात. त्यामुळेच ग्राहकांना जेव्हा गरज असेल तेव्हा तातडीने क्रेडिट कार्डचा लाभ घेता येईल.’

‘तत्क्षण क्रेडिट कार्डांमध्ये डेटा अॅनॅलेटिक्सची यंत्रणा अशापद्धतीने कार्यान्वित झाली आहे की, आम्हाला लगेचच ग्राहकांना ती देता येते तसेच तिचा ग्राहकांना त्वरीत उपयोगही करता येतो. त्यामुळे आम्हांला खात्री आहे की, हे व्हर्च्युअल क्रेडिट कार्ड त्वरीत उपलब्ध झाल्याचा लाभ आमच्या लक्षावधी ग्राहकांना त्यांच्या गरजपूर्तीसाठी होणार आहे,’ असे मोघे यांनी सांगितले.

या क्रेडिट कार्डसाठी शुभारंभाची ऑफर बॅंकेतर्फे जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार हे कार्ड मिळवण्यासाठी ग्राहकांना कसल्याही प्रकारचे शुल्क सुरुवातीला भरावे लागणार नाही; तसेच त्यांना वार्षिक शुल्कही द्यावे लागणार नाही. देशभरात क्रेडिट कार्ड वितरीत करणाऱ्यांमध्ये अॅक्सिस बॅंकेचा चौथा क्रमांक लागतो. देशभरातील एकूण बॅंकिंग क्षेत्रामध्ये या बॅंकेचा वाटा ११.८३ टक्के एवढा आहे. तो दरवर्षी ३२ टक्क्यांनी वाढत आहे. या नवीन तत्क्षण क्रेडिट कार्डांमुळे अॅक्सिस बॅंकेच्या क्रेडिट कार्डांच्या व्यवसायात मोठी वाढ अपेक्षित आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link