Next
डॉ. आंबेडकर महाविद्यालयात ‘एनएसएस’चे उद्घाटन
प्रेस रिलीज
Thursday, August 02, 2018 | 10:53 AM
15 0 0
Share this storyऔंध : रयत शिक्षण संस्थेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालात राष्ट्रीय सेवा योजनेचा (एनएसएस) उद्घाटन सोहळा नुकताच पार पडला. या प्रसंगी इंदापूर येथील आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

या वेळी मार्गदर्शन करताना डॉ. चाकणे म्हणाले, ‘राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये कार्य करणारे विद्यार्थी हे नवनिर्मिती करणारे आणि देशकार्यास हातभार लावणारे विद्यार्थी असतात. ‘एनएसएस’च्या माध्यमातून आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास होतोच; पण आपले चालणे, बोलणे, वागणे आणि विचार क्षमता यांमध्ये चांगला बदल होतो. ‘एनएसएस’ समाजकल्याणाची रुजवात करत असते. त्यामुळे राष्ट्राच्या उभारणीसाठी हे स्वयंसेवक मोलाची भूमिका बजावतात.’

‘जीवनात यशस्वी व्हायचे असेल, तर कष्टाला पर्याय नाही, कारज जे दाणे स्वतःला मातीमध्ये गाडून घेण्यास तयार होत नाहीत, त्यांचे गिरणीमध्ये पीठ होते आणि जे दाणे स्वतःला मातीमध्ये गाडून घेतात त्यांच्यातून नवनिर्मिती होते. ‘एनएसएस’चे स्वयंसेवक हे सुद्धा नवनिर्मिती करणारे आणि देशहिताच्या दृष्टीने कार्य करणारे स्वयंसेवक असतात,’ असे डॉ. चाकणे यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ. मंजुश्री बोबडे म्हणाल्या, ‘राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये विविध मूल्यांची रुजवात केली जाते; तसेच राष्ट्र उभारणीसाठी आवश्यक असणारे कार्यक्रम या योजनेमार्फत घेतले जातात. स्वहिताबारोबारच राष्ट्रहिताची जाणीव या योजनेमधून विद्यार्थ्यांना करून दिली जाते. या योजनेमार्फत महाविद्यालयामध्ये वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात. त्या उपक्रमांमधून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास केला जातो. मालाविद्यालीन तरुणांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण करण्याचे काम ‘एनएसएस’च्या माध्यमातून केले जाते.’

या वेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. विलास सदाफळ, ‘एनएसएस’चे कार्यक्रम अधिकारी डॉ. सुहास निंबाळकर, डॉ. सुप्रिया पवार, प्रा. किरण कुंभार, डॉ. हर्षद जाधव उपस्थित होते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Ujjwala Deore About 219 Days ago
Very nice work man.
0
0
Shital korade About 235 Days ago
Very nice...
0
0

Select Language
Share Link