Next
आंतरराष्ट्रीय महिला चित्रपट महोत्सव आठ मार्चपासून
अंजली मेनन यांच्या हस्ते उद्घाटन
BOI
Wednesday, March 06, 2019 | 04:33 PM
15 0 0
Share this story


पुणे : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त शुक्रवार, आठ मार्च ते रविवार, दहा मार्च २०१९ दरम्यान ‘आंतरराष्ट्रीय महिला चित्रपट महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. ‘तिच्या नजरेतून सिनेमा’ ही या वर्षीच्या महोत्सवाची संकल्पना आहे. महोत्सवासाठी इजिप्त, बांग्लादेश, फ्रान्स, श्रीलंका, तजाकिस्तान आदी देशांमधील एकूण आठ चित्रपट आणि पाच लघुपटांची निवड करण्यात आली आहे. 

महिला पत्रकारांचा ‘आयाम’ गट, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय आणि आशय फिल्म क्लब यांच्या वतीने प्रभात रस्त्यावरील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (एनएफएआय) येथे हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यंदाचे महोत्सवाचे दहावे वर्ष आहे. यावर्षीचा चित्रपट महोत्सव महिला दिग्दर्शकांना समर्पित असून, ‘फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज ऑफ इंडिया’ यांच्या सहकार्याने जागतिक स्तरावरील महिला दिग्दर्शकांचे चित्रपट या महोत्सवाला लाभले आहेत.
चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन आठ मार्च रोजी प्रसिद्ध दिग्दर्शिका अंजली मेनन यांच्या हस्ते होणार असून, प्रमुख पाहुणे म्हणून ‘कोर्ट’ फेम प्रसिद्ध अभिनेत्री गीतांजली कुलकर्णी उपस्थित राहणार आहेत.

उद्घाटनानंतर दिग्दर्शिका अंजली मेनन यांचा ‘लकी रेड सीड्स’ हा चित्रपट दाखवण्यात येईल, तर १० तारखेला सुमित्रा भावे यांच्या ‘वेलकम होम’ चित्रपटाने समारोप होणार असून, या दोन्ही चित्रपटांनंतर दिग्दर्शिकांच्या उपस्थितीत चित्रपटावर चर्चा होणार आहे.

या महोत्सवात तजाकिस्तानच्या शराफत अरबोव्हा, बांग्लादेशच्या शहानायज काकोली आणि तस्मिया अफ्रिन मोऊ, श्रीलंकेची अंजली एस. के, फ्रान्सची डोरिस लन्झमान, इजिप्तच्या हना मोहंमद आणि हला खलील, भारतातील अंजली मेनन, सुमित्रा भावे, दयाली मुखर्जी, पायल सेठ, मयुरी वाळके, बॉबी शर्मा बारुहा, या दिग्दर्शिकांच्या चित्रपटांचा आणि लघुपटांचा समावेश आहे.

उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिला पत्रकारांना देण्यात येणारा ‘आयाम पत्रकारिता पुरस्कार’ यंदा मुक्त पत्रकार हिनाकौसर खान आणि चित्रपट समीक्षक मीनाक्षी शेडडे यांना देण्यात येणार आहे. उद्घाटन सोहळ्यातच पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम होणार आहे. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link