Next
ठाण्यात रंगणार सिंगिंग सुपरस्टार स्पर्धा
BOI
Thursday, May 16, 2019 | 12:56 PM
15 0 0
Share this article:

ठाण्यात होणाऱ्या ‘सिंगिंग सुपरस्टार’ गायन स्पर्धेबाबत माहिती देताना संगीतकार कौशल इनामदार. या वेळी उक्ती फाउंडेशनच्या संस्थापिका गीतांजली लेले, स्वराज्य इव्हेंट्सचे हर्षद समर्थ उपस्थित हॊते.

ठाणे : ‘लहान मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांना चांगले व्यासपीठ मिळावे या उद्देशाने ठाण्यातील ‘स्वराज्य इव्हेंट्स’च्या वतीने प्रथमच ‘सिंगिंग सुपरस्टार’ ही गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेसाठीची स्वरचाचणी ऑनलाइन होणार असून, दोन गटांमध्ये ही स्पर्धा रंगणार आहे,’ अशी माहिती संगीतकार कौशल इनामदार यांनी नुकतीच पत्रकार परिषदेत दिली. ते या स्पर्धेचे मार्गदर्शक आहेत. 

‘या स्पर्धेमध्ये भाषेचे किंवा गायन प्रकाराचे कोणतेही बंधन नाही. यात ठाण्यासह मुंबई आणि नवी मुंबईचेही स्पर्धक सहभागी होऊ शकतात. पाच ते १० वर्षे आणि १० ते १५ वर्षे अशा दोन गटांमध्ये ही स्पर्धा होणार आहे,’ असेही त्यांनी सांगितले. या वेळी उक्ती फाउंडेशनच्या संस्थापिका गीतांजली लेले, स्वराज्य इव्हेंट्सचे हर्षद समर्थ उपस्थित हॊते. 

‘हल्लीच्या लहान मुलांमध्ये खूप टॅलेंट दडलेले आहे. त्यांना योग्य व्यासपीठ मिळावे, लहान वयातच त्यांच्यामध्ये स्टेज डेअरिंग यावे आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी योग्य मार्गदर्शन मिळावे, हाच या स्पर्धेमागचा उद्देश आहे,’ असेही  इनामदार यांनी नमूद केले.

‘स्पर्धेत सहभागी होण्यासाठी  स्पर्धकांनी www.swarajyaevents.com वर नावनोंदणी करावी आणि प्रवेशफेरीसाठी १५ मेपासून ३१ मेपर्यंत एक ते दीड मिनिटांचा एक व्हिडिओ रेकॉर्ड करून singingsuperstar09@gmail.com वर पाठवावा. हा व्हिडिओ फेसबुकवर अपलोड करण्यात येईल. फेसबुक पेजवरील व्हिडिओला मिळालेले लाइक्स (१० टक्के) आणि परीक्षकांनी दिलेल्या गुणांची (९० टक्के) बेरीज करून, त्या आधारे स्पर्धकांची निवड केली जाणार आहे. अंतिम फेरीसाठी २० स्पर्धकांची निवड करण्यात येणार असून, ती नावे पाच जून रोजी घोषित केली जातील. दोन्ही गटांतून तीन पारितोषिके देण्यात येतील. अभिजित करंजकर आणि ओंकार मुळ्ये हे स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम पाहणार आहेत,’ अशी माहितीही इनामदार यांनी दिली.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search