Next
‘बीआयसी सेलो’च्या उपक्रमातून सहा लाख विद्यार्थी शिक्षित
प्रेस रिलीज
Monday, April 01, 2019 | 04:25 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : बीआयसी सेलो या भारतातील आघाडीच्‍या राइटिंग इन्‍स्‍ट्रूमेंट कंपनीने गेल्‍या वर्षी सप्‍टेंबरमध्‍ये ‘सेलो राइट-टू-विन’ हा शालेय उपक्रम राबविला होता. या उपक्रमाच्या माध्यमातून भारतातील दीड हजार शाळांमधील सहा लाख विद्यार्थ्‍यांना शिक्षित करण्यात आले आहे. अध्‍ययन व शिक्षणाप्रती अनुकूल वृत्‍तीला चालना देण्‍याचा या उपक्रमाचा हेतू आहे.

शैक्षणिक अभ्‍यासाचा ताण ही एक सामाजिक समस्‍या बनत आहे. लहान मुलांना परीक्षेची चिंता भेडसावत आहे. विद्यार्थ्‍यांवर शैक्षणिक अभ्‍यासामध्‍ये चांगली कामगिरी करण्‍याचा आणि वर्गात अव्‍वल क्रमांक पटकावण्‍याचा दबाव टाकला जात आहे. शालेय परीक्षांमध्‍ये नापास होण्‍याचा ताण व भीतीचा अनेकदा मुलांच्‍या सामाजिक, भावनिक व शैक्षणिक यशावर दुष्‍परिणाम होऊ शकतो. विद्यार्थ्‍यांना हस्‍ताक्षर सुधारण्‍यामध्‍ये आणि परीक्षांदरम्‍यान येणाऱ्या ताणाचे व्‍यवस्‍थापन करण्‍यामध्‍ये मदत करण्‍यासाठी ‘सेलो राइट-टू-विन’ उपक्रमाची रचना करण्‍यात आली आहे. गेल्‍या वर्षी या उपक्रमाच्‍या सादरीकरणापासून भारतातील दीड हजार शाळांमधील सहा लाख विद्यार्थ्‍यांना शिक्षित केले आहे.

या उपक्रमामध्‍ये दोन कार्यशाळा आहेत. शिक्षण प्रशिक्षण क्षेत्रातील प्रमाणित हस्‍ताक्षर विश्‍लेषक व तज्‍ज्ञांच्‍या टीमने या कार्यशाळा विकसित केल्‍या आहेत. पहिली कार्यशाळा ‘सुंदर हस्‍ताक्षराचे रहस्‍य’मध्‍ये चौथी ते सहावीपर्यंतच्‍या विद्यार्थ्‍यांचा समावेश असतो. हे सत्र त्‍यांच्‍या विकासासाठी आवश्‍यक असलेली तंत्रे शिकवतो आणि त्‍यांचे हस्‍ताक्षर सुधारतो, ज्‍यामुळे त्‍यांना पेन्सिल ते पेनापर्यंत लेखनामधील बदल सहजपणे आत्‍मसात करता येतो.

दुसरी कार्यशाळा ‘तणावमुक्‍त परीक्षा’मध्‍ये सातवी ते नववीपर्यंतच्‍या विद्यार्थ्‍यांचा समावेश आहे. हे सत्र विद्यार्थ्‍यांना चार संज्ञानात्‍मक तंत्रे शिकवतो. ज्‍यामुळे विद्यार्थ्‍यांना त्‍यांची अध्‍ययन व स्‍मरण कौशल्‍ये वाढवण्‍यामध्‍ये मदत होते आणि ते परीक्षांसाठी उत्‍तम तयारी करण्‍यामध्‍ये सक्षम होतात. ही कार्यशाळा विद्यार्थ्‍यांना अचूकपणे व सुस्‍पष्‍ट लेखन गतीने करण्‍याचे देखील प्रशिक्षण देते.

या उपक्रमाबाबत बोलताना बीआयसी सेलोचे डायरेक्टर मार्केटिंग इंडिया तन्‍वीर खान म्‍हणाले, ‘बीआयसी सेलोमध्‍ये आम्‍हाला विद्यार्थ्‍यांना परीक्षांदरम्‍यान सामना कराव्‍या लागणाऱ्या ताणाबाबत माहित आहे. या ताणावर मात करत शैक्षणिक सत्रामध्‍ये उत्‍तम कामगिरी करण्‍यासाठी विद्यार्थ्‍यांना आवश्‍यक तंत्रासह सक्षम करण्‍यासाठी ‘सेलो राइट-टू-विन’ उपक्रमाची रचना करण्‍यात आली. विद्यार्थी व शिक्षकांकडून मिळालेल्‍या सकारात्‍मक प्रतिसादामुळे आम्‍हाला आनंद झाला आहे. आम्‍ही हा उपक्रम सुरू ठेवत भारतभरातील इतर नवीन शाळांपर्यंत घेऊन जाण्‍यासाठी उत्‍सुक आहोत.’

राष्‍ट्रीय मिलिटरी स्‍कूल्‍समधील नववीचा विद्यार्थी कुमार अभिषेक त्‍याचा अनुभव सांगत म्‍हणाला, ‘ही सत्रे अत्‍यंत माहितीपूर्ण व उपयुक्‍त आहेत. या सत्रांमधून आम्‍हाला पेन धरण्‍याच्‍या योग्‍य पद्धती समजल्‍या ज्‍यामुळे आमचे हस्‍ताक्षर सुधारण्‍यामध्‍ये मदत झाली. या उपक्रमादरम्‍यान माइंड मॅप्‍ससारख्‍या अध्‍ययन तंत्रांचा वापर करत परीक्षा तणावमुक्‍त करण्‍यावर लक्ष केंद्रित करण्‍यात आले. मी अभ्‍यासातील उत्‍तम यशासाठी या तंत्रांचा अवलंब करेन. माझ्यातील परीक्षेबाबत असलेली भीती दूर करत मला परीक्षेसाठी सुसज्‍ज करण्‍यासाठी ‘सेलो’चे आभार.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search