Next
रोहन बोपण्णाचे पुण्यातील युवा खेळाडूंना मार्गदर्शन
BOI
Wednesday, January 02, 2019 | 12:39 PM
15 0 0
Share this article:

टेनिसपटू रोहन बोपण्णाने नुकतेच पुण्यात बालेवाडी स्टेडियम येथे ‘टेनिस क्लिनिक’द्वारे युवा खेळाडूंना मार्गदर्शन केले.

पुणे : भारताचा आघाडीचा टेनिस खेळाडू रोहन बोपण्णाने नुकतेच पुण्यात बालेवाडी स्टेडियम येथे ‘टेनिस क्लिनिक’द्वारे युवा खेळाडूंना मार्गदर्शन केले. पुण्यातील विविध टेनिस अकादमींतून १०० प्रतिभावान युवा टेनिसपटू या टेनिस क्लिनिकला उपस्थित होते. रोहन बोपण्णाने दोन तासांहून अधिक वेळ युवा खेळाडूंबरोबर घालवला. त्यांच्याबरोबर प्रत्यक्ष खेळून त्याने मार्गदर्शन केले. या उपक्रमाचे आयोजन ‘एनर्झाल’ने केले होते. 

या वेळी रोहन बोपण्णा म्हणाला, ‘टेनिसचा विकास करण्यासाठी नवीन खेळाडूंकडे लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. भारताच्या भावी टेनिसपटूंना मार्गदर्शन करणे मला खूप आवडते. ‘एनर्झाल’ची आणि माझ्या अकादमीची भागीदारी आहे. आम्हाला आनंद आहे की या भागीदारीमुळे आम्ही युवा खेळाडूांना सक्षम करण्याचे कार्य करत आहेात.’


एफडीसी लिमिटेडचे संचालक अमेय चंदावरकर म्हणाले, ‘या उपक्रमाद्वारे आम्ही युवा खेळाडूंसाठी प्रशिक्षण अधिक आनंददायक करण्याचा प्रयत्न केला आहे. ‘एनर्झाल’ हे आमचे उत्पादन या युवा खेळाडूंना कामगिरी उंचावण्यास मदत करेल.’ 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search