Next
‘बॅंक ऑफ महाराष्ट्र’ला राजभाषा कीर्ती पुरस्कार
प्रेस रिलीज
Monday, September 24 | 03:24 PM
15 0 0
Share this story

उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांच्या हस्ते 'राजभाषा कीर्ती पुरस्कार' स्विकारताना बॅंक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक ए. सी. राऊत. या वेळी गृहमंत्री राजनाथसिंह व बँकेचे अधिकारी राजकिरण भोईर,  डॉ. राजेंद्र श्रीवास्तव आदी.

पुणे : राजभाषा हिंदीचा कामकाजामध्ये प्रभावी वापर केल्याबद्दल ‘बॅंक ऑफ महाराष्ट्र’ला राजभाषा कीर्ती पुरस्कार देशाचे उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. नवी दिल्ली येथील विज्ञान भवन येथे नुकत्याच झालेल्या हिंदी दिवस कार्यक्रमात हा पुरस्कार देण्यात आला. या वेळी बॅंक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक ए. सी. राऊत यांनी हा पुरस्कार स्विकारला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गृहमंत्री राजनाथसिंह हे होते; तर याप्रसंगी गृह राज्यमंत्री हंसराज अहीर, किरण रिजिजू आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. या वेळी ‘बॅंक ऑफ महाराष्ट्र’चे महाव्यवस्थापक (राजभाषा) राजकिरण भोईर, सहायक महाव्यवस्थापक (राजभाषा) डॉ. राजेंद्र श्रीवास्तव आणि दिल्ली क्षेत्राचे मुख्य व्यवस्थापक (राजभाषा) दिनेश गुप्ता देखील उपस्थित होते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link