Next
‘संचारी’ अनुभवण्याची पुणेकरांना संधी
प्रेस रिलीज
Wednesday, January 31 | 06:15 PM
15 0 0
Share this story

पुणे : पारंपरिक नृत्यकला चित्रपटांच्या माध्यमातूनदेखील रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने लाउड अॅपलॉज डान्स मॅगझिन आणि कलावर्धिनी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने ‘संचारी’ या नृत्यविषयक चित्रपटांच्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे.

चित्रपट महोत्सवाविषयी बोलताना कथक नृत्यांगना आणि ‘लाउड’च्या नेहा मुथियान म्हणाल्या, ‘नृत्याचा अविष्कार तर आपण अनेक कार्यक्रमांच्या माध्यमातून अनुभवत असतो; मात्र हे होत असताना नृत्याचे अनेकविध पैलू उलगडून दाखविणारे नृत्यविषयक चित्रपट, माहितीपट यांची नवीन येणाऱ्या कलाकारांच्या पिढीला माहिती व्हावी, त्यांच्यापर्यंत हे चित्रपट पोहोचावेत या उद्देशाने नृत्यविषयक चित्रपटांच्या महोत्सवाचे आयोजन आम्ही केले आहे. प्रसिद्ध कला इतिहासतज्ज्ञ, नृत्य समीक्षक, लेखक आणि मोहन खोकर डान्स अर्काइव्हचे व्यवस्थापकीय विश्वस्त, संचालक आणि क्यूरेटर आशिष खोकर आणि राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय यांच्या विशेष सहकार्याने या चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. अनेक जुन्या चित्रपटांबरोबर कलाकारांवरील चित्रपट आणि माहितीपटांचा समावेश या महोत्सवात असेल.’
    
‘या महोत्सवाच्या माध्यमातून आम्ही नवीन पिढीतील कलाकारांसमोर चित्रपटात नृत्य सादरीकारण कसे असायला हवे याबरोबरच नृत्य शिकताना कोणते चित्रपट आणि जुन्या कलाकारांचे मार्गदर्शन घेणे अपेक्षित आहे यांविषयी माहिती देण्याचा प्रयत्न करीत आहोत. या महोत्सवात दाखविण्यात येणारे सर्व चित्रपट हे मोहन खोकर डान्स अर्काइव्ह, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय आणि फिल्म डिव्हिजन यांच्या सहकार्याने उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या सर्व चित्रपटांचा उपयोग नवीन पिढीला होईल, अशी आमची अपेक्षा आहे,’ असे ‘कलावर्धिनी’च्या सचिव व भरतनाट्यम् नृत्यांगना अरुंधती पटवर्धन यांनी सांगितले.

महोत्सवादरम्यान ‘लास्या काव्या’ हा आंतरराष्ट्रीय भरतनाट्यम् नृत्यांगना अलरमेल वल्ली यांच्यावरील संकल्प मेश्राम यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट, संजू सुरेंद्रन दिग्दर्शित ‘कपिला’, जी. अरविंदन दिग्दर्शित ‘मरट्टम’ आदी चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. याबरोबरच ‘डान्स इन फिल्म्स, फिल्म इन डान्स’ हा आशिष खोकर यांनी संकलित केलेला व ज्येष्ठ कलाकार उदय शंकर, राम गोपाल आणि साधना बोस यांच्या कलेची झलक दाखवणारा चित्रपट महोत्सवात बघायला मिळणार आहे. नृत्यविषयक चित्रपट कसे बनवावेत याविषयीही आशिष खोकर उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.

कार्यक्रमाविषयी :
दिवस : तीन व चार फेब्रुवारी २०१८
वेळ : सकाळी ११ वाजता
स्थळ : राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय, लॉ कॉलेज रस्स्ता, पुणे. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link