Next
‘सिनेपॉलिस’तर्फे वंचित मुलांसाठी चित्रपटाचे विशेष खेळ
‘लेट्स ऑल गो टू सिनेपॉलिस’ या सामाजिक उपक्रमाअंतर्गत आयोजन
प्रेस रिलीज
Wednesday, December 05, 2018 | 05:15 PM
15 0 0
Share this article:मुंबई : ‘सिनेपॉलिस’ या भारतातील आंतरराष्‍ट्रीय आणि जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या मुव्ही थिएटर सर्किटतर्फे भारतातील वंचित मुलांसाठी असलेल्या ‘राउंड टेबल इंडिया’बरोबर सहकार्य करून विशेष खेळांचे आयोजन केले जात आहे. या वर्षी ‘सिनेपॉलिस’कडून १८ शहरांतील साडेचार हजारांहून अधिक वंचित मुलांना बहुप्रतिक्षित असा सायफाय थरार असलेला ‘२.०’ चित्रपट दाखवण्यात आला.

या विषयी बोलताना बोलताना ‘सिनेपॉलिस’ एशियाचे व्यवस्थापकीय संचालक जेवियर सोत्योमयोर म्हणाले, ‘आमचा सामाजिक उपक्रम असलेल्या ‘लेट्सऑल गो टू सिनेपॉलिस’अंतर्गत आम्ही वंचित मुलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्यासाठी प्रयत्नशील आहोत. सिनेमा ही एक अशी शक्ती आहे ज्यामुळे मनावर सकारात्मक परिणाम होतो. एक जबाबदार संस्था म्हणून आम्ही सातत्याने वंचित मुलांनाही लाभ व्हावा यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतो.’

‘सिनेपॉलिस’ इंडियाच्या स्ट्रॅटेजिक उपक्रमाचे संचालक देवांग संपत म्हणाले, ‘राउंड टेबल इंडियासोबत केलेल्या भागीदारीमुळे आमचा उपक्रम भारतात पसरू लागला आहे आणि तो अधिक यशस्वीही झाला आहे. आम्हाला आशा आहे की येत्या काही वर्षांमध्ये तो वाढेल आणि प्रयत्नही वाढीस लागतील.’

या उपक्रमाविषयी माहिती देताना ‘राउंड टेबल’चे राष्‍ट्रीय अध्यक्ष ध्रुव दालमिया म्हणाले, ‘राउंड टेबल इंडिया आणि सिनेपॉलिस यांनी पुन्हा एकत्र येऊन भारतातील हजारो वंचित मुलांच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण केले आहे. उत्सुकता निर्माण करण्याचे , तसेच तरुणाईला ज्ञान देण्याचे चित्रपट एक चांगले माध्यम आहे. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि हाय एन्ड ग्राफिक्स यांचे उत्तम उदाहरण म्हणजे ‘२.०’ हा चित्रपट होय. यामुळे मुलांमध्ये अधिक उत्सुकता निर्माण होऊन ते या क्षेत्रात काम करण्यास उत्सुकता दाखवतील. ‘सिनेपॉलिस’मधील आराम हा एक अनोखा अनुभव असतो, व तो त्यांना उपलब्ध होणार आहे. या उपक्रमाला सहकार्य केल्याबद्दल मी ‘सिनेपॉलिस’चे आभार मानतो.’

ज्या मुलांनी आयुष्यात कधीच सिनेमाघरांना भेट दिली नाही त्यांच्यासाठी ‘सिनेपॉलिस’च्या सिनेमाघरांना भेट देणे म्हणजे एक अविस्मरणीय अनुभव होता. या उपक्रमामुळे त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. चित्रपटानंतर मुलांसाठी विशेष अल्पोपहार आणि चित्रपटाविषयी माहिती देणारे चर्चासत्रही आयो‍जित केले होते. ‘सिनेपॉलिस’तर्फे या उपक्रमाचे गेल्या पाच वर्षांपासून आयोजन केले जात असून, आतापर्यंत २१ हजार ६९० वंचित मुलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search