Next
दहिंदुले ग्रामस्थांची इको-फ्रेंडली वारी
२५७ रोपांचे वाटप
शशिकांत घासकडबी
Thursday, August 09, 2018 | 12:49 PM
15 0 0
Share this storyनंदुरबार :
नुकत्याच होऊन गेलेल्या आषाढी एकादशीनिमित्ताने नंदुरबार तालुक्यातील दहिंदुले बुद्रुक गावात एक अभिनव उपक्रम राबवण्यात आला. गावाचे ग्रामदैवत असलेल्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक वारकरी भाविकाला एक झाड भेट देण्यात आले. आगळ्या-वेगळ्या इको-फ्रेंडली वारीचा हा उपक्रम ग्रामसमितीतर्फे राबविण्यात आला. या वेळी एकूण २५७ रोपांचे वाटप करण्यात आले.

नंदुरबार जिल्हा तसा आदिवासीबहुल मानला जातो. नंदुरबार  शहरापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर दहिंदुले हे गाव आहे. खुर्द व बुद्रुक असे गावाचे दोन भाग आहेत. ग्रामपंचायत एक असूनही गावातील गटातटांच्या राजकारणामुळे गावाचा विकास खुंटला होता. परंतु गेल्या दोन वर्षांपासून सर्व गावकरी केवळ गावाच्या विकासासाठी आपले गटतट बाजूला ठेवून एकत्र आले. त्यातून गावासाठी श्रमदान, लोकवर्गणी या संकल्पना रुजल्या. अनुलोम संस्थेच्या माध्यमातून गाळमुक्त तलाव व जलयुक्त शिवार कार्यक्रमासाठीही गती मिळाली. गावातील ५० ते १०० तरुण दर आठवड्यात एकत्र येऊन श्रमदान करतात. गावातील १५० वर्षांपूर्वीचा तलाव ग्रामस्थांनी गाळमुक्त केला आहे. अशा प्रकारे गावात अनेक विधायक उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यामुळे गाव विकासाच्या वाटेवर आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Dhanaraj mali About 198 Days ago
Nice
1
0

Select Language
Share Link