Next
भाऊ कदम, सागर कारंडे वेब सीरिजमध्ये
हंगामा प्लेच्या ‘श्री कामदेव प्रसन्न’ मालिकेत महत्त्वाची भूमिका
BOI
Tuesday, January 22, 2019 | 05:34 PM
15 0 0
Share this story

हंगामा प्लेच्या वेब सीरिजमधील कलाकार भाग्यश्री मोटे, भाऊ कदम, सागर कारंडे.

मुंबई : विनोदाच्या अफलातून टायमिंगसाठी प्रसिद्ध असलेले भाऊ कदम, सागर कारंडे हे दोघे विनोदवीर आता वेब सीरिजमध्ये धमाल करणार आहेत. हंगामा प्लेच्या ‘श्री कामदेव प्रसन्न’ या वेब मालिकेत हे कलाकार एकत्र काम करत आहेत. त्यांच्यासोबत अभिनेत्री भाग्यश्री मोटेसह आशा शेलार व विनय येडेकरही यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

या बातमीला दुजोरा देत भाऊ कदम म्हणाले, ‘हंगामा प्लेच्या श्री कामदेव प्रसन्न या नवीन मराठी मालिकेसाठी मी शूटिंग सुरू केले आहे. या मालिकेतील माझी व्यक्तिरेखा शब्दश: या पृथ्वीवरील नाही! या मालिकेमध्ये मी आयुष्यातील काही मजेशीर प्रसंगांमध्ये सागरला मदत करताना दिसेन. खरे तर माझी व्यक्तिरेखा हाच त्याच्या आयुष्यातील गोंधळाचे कारण आहे. हंगामा प्लेसोबत एका डिजिटल मालिकेत काम करायला मिळत आहे, याबद्दल मला आनंद वाटत आहे. डिजिटल माध्यमाने रोचक कथा सांगण्याची संधी दिली आहे आणि कलावंतांना यामुळे कोणत्याही अडसराशिवाय काम करण्याचे स्वातंत्र्य मिळत आहे.’

 सागर कारंडे म्हणाला, ‘मी या मालिकेत एका लाजाळू आणि अंतर्मुख माणसाची भूमिका करत आहे. या माणसाच्या आयुष्यात काही अनोख्या घटना घडतात आणि त्या त्याचे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकतात. त्याच्या समस्या सोडवण्यासाठी त्याला भाऊ कदमच्या व्यक्तिरेखेने दिलेली मदत स्वीकारावीच लागते आणि त्यामुळे त्याच्या आयुष्यात आणखी गोंधळ होतो. त्यातून काही विनोदी क्षण निर्माण होतात. मला आणि अन्य सर्व कलाकारांना आमच्या अनोख्या अवतारांमध्ये या मालिकेत पाहणे प्रेक्षकांसाठी खूप मजेशीर असेल, अशी खात्री मला वाटते.’

भाग्यश्री मोटे म्हणाली, ‘आत्तापर्यंत कधीही सांगितल्या गेल्या नाहीत अशा कथा सांगण्यासाठी हंगामा प्लेसारखी व्यासपीठे पुढाकार घेत आहेत. ही खूप सुखद बाब आहे. या मालिकेत मी ज्या मुलीची व्यक्तिरेखा साकारत आहे ती सागरच्या व्यक्तिरेखेवर गुपचूप प्रेम करते. या मालिकेत घडणाऱ्या सर्व गमतीशीर घटनांमागील गुपित काय हे तिला ठाऊक नाही. एक वेगळी व उत्तम लिहिलेली विनोदी कथा असल्याने ही मालिका प्रेक्षकांना खूप आवडेल, अशी खात्री मला वाटते.’

या मालिकेचे दिग्दर्शक संदीप नवरे असून, हंगामा डिजिटल मीडिया आणि कॅफेमराठी यांची निर्मिती असलेली ही मालिका हंगामा प्लेवर लवकरच सादर केली जाईल.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link