Next
बांधावर जाऊन चिमुकल्यांनी केली मतदानाविषयी जनजागृती
BOI
Wednesday, April 17, 2019 | 05:19 PM
15 2 0
Share this article:सोलापूर :
‘आपल्या देशातील लोकशाही बळकट करण्यासाठी सर्वांनी मतदान करा,’ असे आवाहन रोपळे (ता. पंढरपूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील चिमुकल्यांनी शेताच्या बांधावर जाऊन केले. सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघातील मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून रोपळे बुद्रुक जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सुनील शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान जनजागृतीसाठी विद्यार्थांनी गावातून प्रभातफेरी काढली. या वेळी विद्यार्थ्यांनी वाडी-वस्ती व शेताच्या बांधावर जाऊन ग्रामस्थ व शेतकऱ्यांना मतदान करण्याचे आवाहन केले. ‘लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदान करा,’ ‘मतदानासाठी वेळ काढा, आपली जबाबदारी पार पाडा,’ ‘निर्भय होऊन मतदान करा,’ ‘जागरूक नागरिक होऊ या, अभिमानाने मतदान करू या,’ ‘मत आहे आमचा अधिकार, कधीही करू नका त्याला बेकार,’ अशी घोषवाक्ये लिहिलेले फलक हातात घेऊन या वेळी विद्यार्थ्यांनी घोषणा दिल्या. शेतकरी असो वा शेतमजूर, त्यांची भेट घेऊन चिमुकल्यांनी त्यांना मतदान करण्यासाठी प्रवृत्त केले. मतदान जनजागृती अभियान यशस्वितेसाठी अरुण माळी, पद्मिनी व्यवहारे, शशिकांत कांबळे, वर्षाराणी गोडसे, वैशाली जगताप, कल्पना माने, छाया मसलखांब, तानाजी ढेकळे, अजिनाथ पवार, समाधान आयरे, प्रमोद लोणारकर या शिक्षकांनी प्रयत्न केले. 

‘मतदानाचा हक्क प्रत्येकाला असूनही शंभर टक्के मतदान होत नाही. त्यामुळे प्रत्येक मतदाराने आपला मतदानाचा हक्क बजावून आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्याची गरज आहे,’ असे निवृत्त कृषी पर्यवेक्षक मधुकर गुंजाळ यांनी सांगितले. 

 
15 2 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Bal Gramopadhye About 179 Days ago
Best time to form habits of thinking . Democracy in the country Would be safe .
0
0
परमेश्वर माळी , रोपळे बु.ता.पंढरपूर About 179 Days ago
प्रत्येक बुथवर शंभरटक्के मतदान होणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे आपले गाव, जिल्हा, राज्य व देशाच्या हितासाठी सर्वांनी मतदान केलेच पाहिजे.
0
0
मामा भोसले , रोपळे ता.पंढरपूर ,जि.सोलापूर About 179 Days ago
मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी चिमुकल्यांनी केलेला प्रयत्न आदर्शच आहे. लोकशाही रूजवण्याचेच काम आहे. सर्व शिक्षकांचे अभिनंदन !
0
0
Arvind Kumbhar About 179 Days ago
स्त्युत्य उपक्रम.. बालवयात लोकशाही बद्दल चांगली संस्कृती ची रोपण...
0
0

Select Language
Share Link
 
Search