Next
त्र्यंबक विनायक सरदेशमुख, दामोदर नरहर शिखरे
BOI
Wednesday, November 22 | 12:45 AM
15 0 0
Share this story

‘शारदीय चंद्रकळा अविरत बरसते आहे. सनातन आणि नित्यनूतन. देशोदेशींचे हे चांदणे आकाशभर पाझरते आहे. ते माझ्यात जितके उतरेल तितक्याने मला समृद्ध आणि जीवट केले आहे,’ असं म्हणणारे त्र्यं. वि. सरदेशमुख आणि ज्येष्ठ गांधीवादी लेखक दामोदर शिखरे यांचा २२ नोव्हेंबर हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय...
..............
त्र्यंबक विनायक सरदेशमुख

२२ नोव्हेंबर १९२२ रोजी अक्कलकोटमध्ये जन्मेलेले त्र्यंबक विनायक सरदेशमुख हे कादंबरीकार आणि समीक्षक म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी ‘वैशाख’ या टोपणनावाने काव्यलेखन केलं होतं. त्यांनी कादंबरी, कविता, समीक्षा, नाटक, अनुवाद असे वेगवेगळ्या प्रकारचे लेखन केलं. सखोल चिंतन करून लिहिणं हे त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य. 

‘शारदीय चंद्रकळा अविरत बरसते आहे. सनातन आणि नित्यनूतन. देशोदेशींचे हे चांदणे आकाशभर पाझरते आहे. ते माझ्यात जितके उतरेल तितक्याने मला समृद्ध आणि जीवट केले आहे,’ असं अतिशय सुरेख लिहून देशविदेशातल्या प्रतिभावांतांच्या साहित्याची उत्तम समीक्षा करणाऱ्या सरदेशमुखांना २००३ साली साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. त्यांची ‘डांगोरा : एका नगरीचा’ ही १९२० आणि १९३०च्या दशकांमधल्या सामाजिक परिवर्तनाचा वेध घेणारी कादंबरी गाजली होती. 

ससेमिरा, उत्तररात्र, उच्छाद, डांगोरा : एका नगरीचा, प्रदेश साकल्याचा, बखर एका राजाची, शारदीय चंद्रकळा, गडकऱ्यांची समग्र नाटके, देवदूत, काफ्काशी संवाद, टाहो, थैमान, असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे. 

१२ डिसेंबर २००५ रोजी त्यांचं निधन झालं. 

(सरदेशमुख यांची पुस्तके बुकगंगा डॉट काम वरून घरपोच मिळवण्यासाठी येथे क्लिक करा).
.............................

दामोदर नरहर शिखरे

२२ नोव्हेंबर १९०३ रोजी जन्मलेले दामोदर नरहर शिखरे हे चरित्रकार आणि कादंबरीकार म्हणून प्रसिद्ध होते. 

ते गांधीवादी विचारवंत होते. त्यांनी गांधी जीवनकथा, गांधी रणगीता आणि राष्ट्रमाता कस्तुरबा चरित्र ही पुस्तकं लिहिली आहेत. 

याशिवाय त्यांची जातीय ऐक्य, अर्थकारण, मराठीचे पंचप्राण, आईची कृपा, क्रांतीकिरण, गंगेचे थेंब अशी सुमारे १५० पुस्तकं प्रकाशित झाली आहेत.

नऊ सप्टेंबर १९८० रोजी त्यांचा मृत्यू झाला. 

(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link