Next
सर्वोत्तम कंपनी म्हणून ‘फेडेक्स’ सन्मानित
प्रेस रिलीज
Thursday, December 27, 2018 | 02:53 PM
15 0 0
Share this story

पुणे : फॉर्च्युन या नियतकालिकाकडून ‘फेडेक्स’ला २०१८ या वर्षातील विविधतेसाठी सर्वोत्तम कंपनी म्हणून सन्मानित करण्यात आल्याची माहिती फेडेक्स कॉर्प.तर्फे देण्यात आली.

वैविध्यतेसाठी सर्वोत्तम काम करण्याच्या जागांबाबत ‘फॉर्च्युन’कडून महिलांचा अनुभव, विविध रंग असलेली माणसे, एलजीबीटी समाजाचे सदस्य, वृद्ध व्यक्ती आणि दिव्यांग व्यक्तींवर भर देण्यात येतो. या कर्मचाऱ्यांनी कंपनीबाबत विश्वास, अभिमान, सहकार्याची भावना याबाबत सर्वेक्षणात दिलेल्या प्रतिक्रिया आणि याच ठिकाणी काम करणाऱ्या त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितलेल्या प्रतिक्रिया यावरून हे मानांकन देण्यात आले. त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांचे नाविन्यतेचे दैनंदिन अनुभव, कंपनीची मूल्ये आणि त्यांच्या नेतृत्वाचा प्रभाव लक्षात घेतला जातो, जेणेकरून त्यांना सातत्याने अनुभव प्रदान केला जातो, याची खातरजमा करण्यात येते.

फेडेक्स कॉर्प.चे अध्यक्ष आणि चीफ ऑपरेटिंग ऑफिसर डेव्हिड ब्रोन्झेक म्हणाले, ‘फेडेक्समध्ये आम्ही वैविध्यता आणि समावेशकता हे घटक निर्धाराने राबवतो, याबद्दल आम्हाला अभिमान आहे आणि हे दोन्ही घटक आमचे व्यावसायिक प्राधान्य आणि कॉर्पोरेट संस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहेत. जगातील २२० हून अधिक देश आणि प्रदेशांना सेवा प्रदान करणारी जागतिक पातळीवरील दळणवळण कंपनी म्हणून आम्ही सेवा देत असलेल्या वैविध्यपूर्ण जगाप्रमाणेच वैविध्यपूर्ण मनुष्यबळ असल्याचा आम्हाला अभिमान आहे. ‘फॉर्च्युन’च्या वैविध्यपूर्णतेसाठीच्या सर्वोत्तम काम करण्याच्या जागांमध्ये पुन्हा एकदा या वर्षी समावेश होणे, हा आमचा बहुमान आहे.’

‘टीमचे सदस्य हे सर्वात मोठी संपत्ती आहे, याची फेडेक्सला जाणीव आहे. वैविध्यपूर्ण आणि सर्वसमावेशक कार्यशैलीला प्रोत्साहन देणे आणि त्यात सातत्य राखणे याला कंपनीतर्फे सर्वाधिक प्राधान्य देण्यात येते आणि त्यामुळे जगभरातील चार लाख २५ हजारांहून अधिक मनुष्यबळाला भरभराट करण्याची संधी मिळते. आपल्या कॉर्पोरेट डायव्हर्सिटी काउन्सिल आणि प्रशिक्षणातील व्यापक वैविध्यतेसोबतच ‘फेडेक्स’ आपली भरती, विकास, मार्गदर्शन, प्रगतीच्या संधी यातही वैविध्य व समावेशकता विणते, जेणेकरून अस्थापनेमधील सर्व पातळ्यांवरील पाइपलाइनमध्ये वैविध्यपूर्ण गुणवान कर्मचारी असतील,’ असे ब्रोन्झेक यांनी सांगितले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link