Next
खडतर परिस्थितीतून बाहेर येण्याची ‘पीएनबी’ची क्षमता
प्रेस रिलीज
Saturday, March 24, 2018 | 01:54 PM
15 0 0
Share this story

मुंबई : पंजाब नॅशनल बँकेमध्ये (पीएनबी) सध्या निर्माण झालेली परिस्थिती हाताळण्यासाठी तसेच ग्राहक व भागभारकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आवश्यक क्षमता व कर्तृत्व असल्याचा पुनरुच्चार भारतातील पहिल्या स्वदेशी बँकेने केला आहे.

स्वच्छ व जबाबदार बँकिंग हा ‘पीएनबी’चा एक संस्था म्हणून आधारस्तंभ राहिला आहे. अनैतिक पद्धतींना बँकेच्या प्रणालीत अजिबात थारा दिला जात नाही. ग्राहकांच्या आर्थिक हिताचे संरक्षण करण्यासाठी तसेच कर्जे वसूल करण्यासाठी बँकेने तत्पर पावले उचलली आहेत. बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील मेहता यांनी सर्व ‘पीएनबी’ कर्मचाऱ्यांना लिहिलेल्या पत्रातून हे जाहीर करण्यात आले आहे.

सुनील मेहतामेहता म्हणाले, ‘खडतर काळ कायम टिकत नाही; पण कणखर माणसे टिकतात. आपल्यासोबत बँकिंग करणाऱ्या काही ग्राहकांना या क्षणाला कदाचित थोडी चिंता जाणवत असेल. आपण त्यांच्या भावनांकडे संवेदनशीलतेने बघूया आणि त्यांनी बँकेवर टाकलेला विश्वास आपण खऱ्या अर्थाने सार्थ ठरवू अशी ग्वाही त्यांना देऊ या. गेली अनेक वर्षे बँकेने आपले सर्व ग्राहक, कर्मचारी, भागधारक, व्हेंडर्स, नियमनकर्ते आणि सरकार यांचा विश्वास प्राप्त केला आहे. बँकेला वाढीच्या योजना कार्यान्वित करण्यासाठी पाच हजार ४७३ रुपयांचा निधी देऊन सरकारने अलीकडेच पाठिंबा दाखवला आहे. आपली बँक अत्यंत सुरक्षित आणि सशक्त आहे, अशी ग्वाही मी तुम्हाला सगळ्यांना देतो.’

राष्ट्राच्या बांधणीत बँकेने बजावलेली भूमिका आणि अर्थव्यवस्थेचा कणा होऊन केलेले काम अधोरेखित करून २०१८ या आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत नफ्यात असलेल्या मोजक्या बँकांमध्ये ‘पीएनबी’ होती, यावर बँकेने प्रकाश टाकला. सर्वोच्च सीएएसए (करंट अकाउंट, सेव्हिंग अकाउंट) वाटा, स्थिर पतधोरण, दमदार पतवाढ, योग्य भांडवल आणि कमी ‘कॉस्ट टू कॉस्ट’ उत्पन्न गुणोत्तर या पाच जमेच्या बाजू बँकेकडे आहेत.

बँकेच्या प्रणाली व प्रक्रिया आणखी मजबूत करण्यासाठी केल्या जात असलेल्या उपायांमध्ये केवळ अंतर्गत नियंत्रण यंत्रणा सशक्त करण्यावर नव्हे, तर ग्राहकांच्या विस्तृत भेटींमधून तक्रार निवारणावरही भर दिला जात आहे. छोट्या ठेवीदारांना लक्ष्य करून करंट आणि बचत खात्यांवर (सीएएसए) अधिक लक्ष देण्याचा निर्णय बँकेने घेतला आहे.  ४० टक्क्यांहून अधिक संसाधने ‘सीएएसए’ खात्यांमधून निर्माण होत आहेत.

‘पीएनबी’च्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या समर्पक वृत्तीने तसेच वचनबद्धतेने ही संस्था उभी केली आहे. काही जणांच्या अनैतिक वर्तनामुळे बँकेने राष्ट्राच्या उभारणीत बजावलेली भूमिका व समाजावर टाकलेला कधी न पुसला जाणारा प्रभाव हे नाकारले जाऊ नये, असे या पत्रात म्हटले आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link