Next
डीसीबी बँकेतर्फे डीसीबी रेमिट
प्रेस रिलीज
Monday, March 12, 2018 | 02:49 PM
15 0 0
Share this story

मुंबई : ‘डीसीबी बँक’ या अत्याधुनिक खासगी बँकेने  ‘डीसीबी रेमिट’ नावाची सेवा दाखल केली असून, त्यामुळे भारतात बँक खाते असलेल्या निवासी भारतीयांना जगभर ऑनलाइन पद्धतीने रेमिट करणे किंवा पैसे पाठवणे शक्य होणार आहे.

डीसीबी रेमिट ही वापरण्यास सुलभ सेवा असून, त्यामुळे कोणत्याही निवासी भारतीयाला ऑनलाइन नोंदणी करणे आणि अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, यूके, यूएई व जर्मनी यासह वीस देशांत निधी हस्तांतरित करणे, तसेच मोबाइल फोनवरून मागोवा घेणे शक्य होणार आहे. 

एक्स्चेंज दर निश्चित झाला की, ग्राहक कोणत्याही खात्यातून डीसीबी बँकेच्या खात्यात निधी हस्तांतरित करू शकतो. त्यानंतर हा निधी परदेशातील लाभार्थीच्या खात्यात पुढील कामाच्या दिवशी हस्तांतरित केला जातो. डीसीबी रेमिट सेवा केव्हाही, ऑनलाइन उपलब्ध आहे. 
 

डीसीबी बँकेच्या रिटेल व एसएमई विभागाचे प्रमुख प्रवीण कुट्टी म्हणाले, ‘डीसीबी रेमिटमुळे ग्राहकांना केव्हाही व कोठूनही सुरळितपणे बँकिंग व्यवहार करता येतात. त्यांना परदेशात पैसे पाठवण्यासाठी बँकेच्या शाखेत किंवा मनी एक्स्चेंजच्या कार्यालयात जाण्याची गरज नाही. या ‘विशेष आउटवर्ड फंड ट्रान्स्फर’ला ‘आउटवर्ड रेमिटन्स’ असेही म्हटले जाते. त्यामुळे वेळेची व मेहनतीची बचत होते आणि परदेशात राहणाऱ्या प्रियजनांपर्यंत पोहोचता येते. डीसीबी रेमिटमार्फत परदेशात सहज व सुलभपणे निधी हस्तांतरित करता येतो.  डिजिटल रेमिटन्सच्या वाढत्या क्षेत्रात आम्ही दाखल केलेल्या अनेक उत्पादनांपैकी हे एक आहे.”

‘अॅव्हेन्यूज पेमेंट्स’च्या सहयोगाने डीसीबी बँकेने डीसीबी रेमिट दाखल केले आहे. दोन्ही कंपन्यांच्या कौशल्यामुळे व अनुभवामुळे डीसीबी रेमिटला बळ मिळणार आहे.
अॅव्हेन्यूज पेमेंट्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी नौशाद काँट्रॅक्टर यांनी सांगितले, ‘तंत्रज्ञान क्षेत्रातील आमच्या कौशल्याचा लाभ वैविध्यपूर्ण ग्राहकांना देण्यासाठी, डीसीबी बँकेसारख्या भविष्यात्मक व डायनॅमिक बँकेसोबत काम करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. डीसीबी रेमिट हे डिजिटल पेमेंट क्षेत्रातील अत्याधुनिक उत्पादन असून, त्यामुळे परदेशात पेमेंट करण्याची प्रक्रिया पेपरलेस होणार आहे व ही सेवा अखंड उपलब्ध असेल.’

अॅव्हेन्यूज पेमेंट्सचे संचालक आणि सीसीअॅव्हेन्यूचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास पटेल म्हणाले, ‘डीसीबी बँकेशी आम्ही केलेल्या भागीदारीमुळे देशभरातील पेमेंट खऱ्या अर्थाने डिजिटाइज केले जातील. या सक्षम व लवचिक सुविधेमुळे डीसीबी बँकेला कार्यक्षम व तत्पर रेमिटन्स सेवा देणे शक्य होईल व झपाट्याने बदलत्या रेमिटन्स क्षेत्रात वाटचाल करण्यासाठी मदत होईल’.

डीसीबी बँकेविषयी
डीसीबी बँक लिमिटेड ही आधुनिक उदयोन्मुख खासगी बँक असून १९ राज्ये व तीन केंद्रशासित प्रदेशांत तिच्या तीनशे अकरा शाखा आहेत. ही शेड्युल्ड कमर्शिअल बँक असून, तिचे नियमन भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारे केले जाते. या बँकेचे व्यवस्थापन व प्रशासन प्रोफेशनल पद्धतीने केले जाते. डीसीबी बँकेकडे अद्ययावत तंत्रज्ञान व पायाभूत सुविधा असून, त्यामध्ये भारतातील पहिली आधार क्रमांक व फिंगरप्रिंटवर आधारित एटीएम, पर्सनल व बिझनेस बँकिंग ग्राहकांसाठी इंटरनेट बँकिंग यांचा समावेश आहे. डीसीबी बँकेचे सहा लाखांहून अधिक सक्रिय ग्राहक आहेत.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link