Next
‘आयसीएसआय’तर्फे विविध उपक्रमांचे आयोजन
प्रेस रिलीज
Monday, March 04, 2019 | 04:10 PM
15 0 0
Share this article:



पुणे : दी इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (आयसीएसआय) ही संस्थेमार्फत कंपनी सेक्रेटरी या व्यवसायाच्या विकासासाठी व नियम व कायद्यांच्या संरक्षणाचे कार्य केले जाते. या संस्थेचे प्रेसिडेंट म्हणून सीएस रणजीत पांडे यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना या वर्षी इन्स्टिट्यूटतर्फे विविध उपक्रम राबविले जाणार असल्याची माहिती दिली.

पांडे यांनी म्हणाले, ‘२०२२चे ध्येय समोर ठेऊन संस्थेने अभ्यासक्रमात बदल केला असून, हा अभ्यासक्रम व्यावहारिकदृष्ट्या विद्यार्थ्यांना परिपूर्ण करणारा आहे. नवीन अभ्यासक्रमाअंतर्गत एक्सअॅक्टीव्ह प्रोग्राम परीक्षा डिसेंबर २०१८मध्ये यशस्वीरित्या घेण्यात आली आणि प्रोफेशनल प्रोग्राम ही परीक्षा जून २०१९मध्ये आयोजित केली जाईल. ‘आयसीएसआय’ आपल्या ५६ हजार सदस्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचले असून, ३.५ लाख ऑनरोल विद्यार्थी आहेत. संस्थेने तक्रार निवारण कक्ष तयार केला आहे. ज्यामध्ये पोर्टल व कॉल सेंटरद्वारे येणाऱ्या तक्रारींचे निवारण केले जाईल.’

‘आम्ही शहीद जवानांच्या मुलींसाठी पुढाकार घेतला आहे. ‘शहीद की बेटी’ उपक्रमांतर्गत संस्थेने संस्थेच्या विविध कार्यक्रमांसाठी आमंत्रित मान्यवर, वक्ते यांना स्मृतिचिन्ह व इतर भेटवस्तू देणे बंद केले आहे. या रकमेचा वापर शहिदांच्या मुलींच्या शिक्षणासाठी व कल्याणकारी योजनांसाठी केला जाणार आहे. संस्थेने ‘आयसीएसआय स्टुडंट्स एज्युकेशन फंड ट्रस्ट’ तयार केले असून, ते आर्थिकदृष्ट्या मागास आणि शैक्षणिकदृष्ट्या उज्ज्वल विद्यार्थ्यांना कंपनी सेक्रेटरी कोर्स करण्यास प्रोत्साहन देते,’ अशी माहिती पांडे यांनी या प्रसंगी दिली.

संस्थेने लक्षद्वीप, अंदमान आणि निकोबार बेटे, उत्तर-पूर्व राज्य, दमन, दीव आणि पुडुचेरीमध्ये अभ्यास केंद्र योजनेअंतर्गत अभ्यास केंद्रांची स्थापना केली आहे. त्याचप्रमाणे संस्था शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये  कंपनी सेक्रेटरीजविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी ‘सीएस ऑलिंपियाड’ नावाचा अनोखा उपक्रम दर वर्षी राबविला जातो.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search