Next
मुंबईत ‘मंथन २०१९’ परिषद उत्साहात
प्रेस रिलीज
Thursday, July 04, 2019 | 01:07 PM
15 0 0
Share this article:


मुंबई : जेम व ज्वेलरी उद्योगात सर्वांत महत्त्वाची मानली जाणारी ‘मंथन २०१९’ परिषद ‘ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिल’तर्फे मुंबईतील हॉटेल सहारा स्टारमध्ये दोन आणि तीन जुलैला आयोजित करण्यात आली होती. यात भारतीय उद्योग क्षेत्रातील कर्तृत्ववान व दिग्गज व्यक्तींनी मार्गदर्शन केले. या वेळी एक हजारांहून अधिक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. 
 
‘एनएसई’ने सादर केलेल्या व ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’तर्फे प्रायोजित या कार्यक्रमास लॉजिस्टिक्सचे साह्य ‘बीव्हीजी लॉजिस्टिक्स’ने दिले. ‘फोरएव्हरमार्क’तर्फे अन्य साह्य ‘जीआयए’तर्फे लॅबोरेटरी, ‘शाइनशिल्पी’तर्फे ज्वेलरी, ‘अ‍ॅक्मे इन्फिनिटी’तर्फे सॉफ्टवेअर आणि ‘डिव्हाइन सॉलिटेअर’तर्फे सॉलिटेअर या परिषदेस लाभले.


गेल्या वर्षी झालेले ‘मंथन २०१८’ परिषदेचे आयोजन हा भारतीय रत्ने आणि दागिने उद्योगाच्या इतिहासातील पहिला व अत्यंत महत्त्वाचा टप्पा होता. या दुसर्‍या वर्षात ‘मंथन २०१९’मध्ये २७ निरनिराळ्या उद्योग-व्यवसायांतील तज्ज्ञ सहभागी झाले होते. बँकिंग पॅनेल, क्वालिटी पॅनेल, लक्झरी पॅनेल, तरुणाई पॅनेल, तंत्रज्ञान पॅनेल, प्रशासन पॅनेल, जाहिरात पॅनेल व आंतरराष्ट्रीय पॅनेल अशा वेगवेगळ्या पॅनेल्सच्या माध्यमातून तज्ज्ञांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. 

या वेळी जीएमएमएफएल-अमूलचे एमडी आर. एस. सोधी, ‘एनएसई’चे एमडी व सीईओ विक्रम लिमये, रिलायन्स जिओचे अध्यक्ष सुनील दत्त, केंटचे एमडी महेश गुप्ता, अ‍ॅडलॅब्स एंटरटेनमेंटचे एमडी धीमंत बक्षी, भारत मॅट्रिमॉनीचे सीईओ जे. मुरुगा, सारेगामाचे एमडी विक्रम मेहरा, युनियन बँक ऑफ इंडियाचे अध्यक्ष केवल हांडा, पेटीएमचे संचालक प्रवीण जाधव, बँक ऑफ बडोदाचे कार्यकारी संचालक विक्रमादित्य खिची, लोकमतचे संयुक्त एमडी हृषी दर्डा, पॉवर एक्सचेंज ऑफ इंडिया लि.चे एमडी प्रभाजित सरकार, केरळ रेल्वे विकासचे एमडी अजितकुमार वासुदेवन, युट्यूब आणि ब्रँड अ‍ॅडव्हर्टायझिंगचे भास्कर रमेश डीएएमएसीचे वरिष्ठ संचालक डॉ. अनंत सिंग रघुवंशी, हायपरकलेक्टिव्हचे संस्थापक आणि सीसीओ के. व्ही. श्रीधर, डीबी ग्रुपचे सीएमओ सुश्री काकन सेथी, सिक्स सेंसेस हॉटेल्स रिसॉर्ट्स स्पाचे वर्कप्लेस वेलनेस कन्सल्टंट अर्जुन वरदराज, जेएलएलचे सीईओ आणि कंट्री हेड रमेश नायर आदी उपस्थित होते. 


जेम्स व ज्वेलरी या क्षेत्रातील जाणकार वक्त्यांमध्ये जेम अँड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन काउंसिलचे अध्यक्ष प्रमोद कुमार अग्रवाल, मलाबार गोल्डचे एमडी आशेर ओ., ब्लूस्टोनचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव सिंग कुशवाला, पीएनजी ज्वेलर्ससचे सीएमडी सौरभ गाडगीळ, वामन हरि पेठेचे आशिष पेठे, जीजेसीचे माजी माध्यक्ष नितीन खंडेलवाल, फॉरेव्हरमार्कचे एमडी सचिन जैन, जीआयए, इंडिया आणि मिडल ईस्टच्या एमडी सुश्री निरुपा भट्ट, पारेख ज्वेलर्सचे हार्दिक पारेख, एएलटीआरचे अध्यक्ष अमिश शहा, डिव्हाइन सॉलिटेअर्सचे एमडी जिग्नेश मेहता, मेटल फोकसचे चिराग शेठ, आयबीजेएचे राष्ट्रीय अध्यक्ष पृथ्वीराज कोठारी, भोलासन्स ज्वेलर्सचे एमडी डॉ. राजेंद्र भोला, सेन्को गोल्डचे कार्यकारी संचालक सुवणकर सेन यांनी मार्गदर्शन केले. 

‘जीजेसी’चे अध्यक्ष अनंत पद्मनाभन म्हणाले, ‘बहुसंख्य असंघटित सराफ व्यावसायिकांना संघटित उद्योगाच्या दिशेने खशए घेऊन जाता येईल, या दृष्टीने आम्ही विचारविनिमय केला आणि त्यानंतर प्रगतीशील, परिवर्तनीय पाऊल उचलून ‘मंथन’ ही संकल्पना राबविण्यास सुरुवात केली. विचारांची देवघेव, दृष्टीकोनांचा विकास आणि अंतर्दृष्टींचे मंथन करण्याच्या या प्रक्रियेमुळे नवीन मानसिकता, उद्दिष्ट आणि कार्यप्रणाली निर्माण होतील, असे आमचे मत आहे. ‘मंथन’मुळे सराफ यावसायिकांच्या मनात आत्मविश्वास जागृत होऊन व्यवसायातील कोणत्याही अडचणींवर मात करण्याची त्यांच्यात क्षमता निर्माण होते.’

या प्रसंगी ‘जीजेसी’चे उपाध्यक्ष शंकर सेन म्हणाले, ‘प्रतिकूल वातावरणातही व्यवसायवाढीसाठी जी तत्त्वे अंगी बाळगणे महत्त्वाचे ठरते, त्यांचा लाभ ‘मंथन २०१९’मुळे सराफ व्यावसायिकांना होईल. ‘मंथन २०१८’ हा एक प्रेरणादायी अनुभव होता आणि त्यात सहभागी झालेल्यांना आयुष्यभर लक्षात राहतील असे विविध क्षेत्रांतील दिग्गजांचे विचार ऐकायला मिळाले होते. क्रिकेटपटू सौरव गांगुली याने त्याच्या आयुष्यातील काही अनुभव सांगितले, तर नेस्ले कंपनीचे सीएमडी सुरेश नारायणन यांनी मॅगी नूडल्सबाबत निर्माण झालेल्या समस्येबद्दल काही बाबी नमूद केल्या. ‘संबर्धन मदर्सन ग्रूप’चे अध्यक्ष विवेकचंद सहगल यांनी ‘भारतीय विचारधारा आणि जागतिक आकांक्षा’ या त्यांच्या विचारधारेबद्दल सांगितले. या पार्श्वभूमीवर ‘मंथन २०१९’कडूनही सर्वांनी उच्च अपेक्षा बाळगल्या आहेत आणि आम्ही त्या पूर्ण करण्याचा कसोशीने प्रयत्न करू.’


‘मंथन’चे संयोजक मनोज कुमार झा या प्रसंगी म्हणाले, ‘ज्ञान मिळवण्याची आकांक्षा माणसाला सतत असल्याने ‘मंथन’सारख्या विचार-प्रवर्तक कार्यक्रमांची गरज आहे. विविध पार्श्वभूमी आणि कौशल्य असलेल्या उद्योगांमधील व्यावसायिकांकडून चार गोष्टी शिकणे, जेणेकरून त्या ज्ञानाचा उपयोग आपल्या नेहमीच्या व्यवसायात करता येईल, असा या ज्ञान आदान-प्रदान करण्याच्या या आगळ्या सोहळ्याचा उद्देश आहे. या विचारमंथनातूनच काही आगळेवेगळे करण्याची स्फूर्ती मिळते व नवकल्पना सुचतात. आपला व्यवसाय कसा वाढवायचा एवढीच माहिती यातून मिळत नाही, तर मिळालेले ज्ञान कसे अमलात आणायचे व त्यातून अनेक फायदे कसे मिळवायचे, हेही या परिषदेत उपस्थित राहिलेले सदस्य शिकू शकतात.’

(Please click here to read this news in English.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search