Next
भारतीय भाषेतील अनुवादकांचा सत्कार
BOI
Thursday, February 07, 2019 | 05:51 PM
15 0 0
Share this article:

पुणे : भारतीय भाषांमधील साहित्य मराठीत व मराठीतील साहित्य इतर भारतीय भाषांमध्ये अनुवादित करून या भाषांमध्ये एकप्रकारे भगिनी भाव वाढत असतो. मराठीतील अनुवादक सातत्याने हे काम करत आहेत. अशा नामवंत अनुवादकांचा यंदा सत्कार-सन्मान करण्याचे ‘आंतरभारती’, पुणे यांनी ठरवले आहे.

रविवारी (१० फेब्रुवारी) सायंकाळी साडे पाच वाजता नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. ‘आंतरभारती’ हे साने गुरुजींचे एक स्वप्न होते. ते पूर्ण करण्यासाठी त्यांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले. साने गुरुजी स्वातंत्र्य चळवळीत असताना त्रिचरापल्ली जेलमध्ये विविध भाषा बोलणाऱ्या स्वातंत्र्य सौनिकांशी त्यांचा संपर्क आला. भाषेमुळे एकमेकांशी संपर्क करणे, संवाद करणे अडचणीचे होत आहे असे दिसले, त्यावेळी आपण मातृभाषेशिवाय इतरही भाषा शिकाव्यात व त्या भाषेतील सर्वोत्तम साहित्य, विचार आपणांस समजावे अशी त्यांची भावना होती. ‘आंतरभारती’ म्हणजे हृदयाची भाषा. ती एकमेकांना प्रेमाच्या धाग्याने बांधते.

भाषा ही माणसाच्या व्यक्त होण्याचे जसे साधन आहे, तसेच एकत्र बांधण्याचे माध्यमही आहे. माझ्या भाषेसह इतर भाषांविषयी प्रेम असणे गरजेचे आहे. भाषा, धर्म, जात आणि प्रांत यावरून भेदाभेद न करता आपण भारतीय आहोत हीच एकमेव ओळख आहे .

या सत्कार समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख आणि ‘आंतरभारती’चे राष्ट्रीय अध्यक्ष प्राचार्य सदाविजय आर्य उपस्थित राहणार आहेत. या जाहीर सत्कारासाठी हजर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search