Next
‘लायन्स’तर्फे डॉ. ग्रांट, डॉ. पाठारे यांना पुरस्कार जाहीर
प्रेस रिलीज
Saturday, November 17, 2018 | 01:21 PM
15 0 0
Share this article:

पुणे : ‘लायन्स क्लब इंटरनॅशनल, रुबी हॉल क्लिनिक व पतित पावन संघटना यांच्या वतीने जागतिक मधुमेह दिनानिमित्त मोफत मधुमेह तपासणी व अवयवदान जनजागृती कार्यक्रम आयोजित केला आहे. या वेळी प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. परवेज ग्रांट यांना समाजरत्न पुरस्कार, तर वैद्यकीय सेवा संचालक डॉ. संजय पाठारे यांना समाज मित्र पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे,’ अशी माहिती लायन्स क्लब्जचे माजी प्रांतपाल चंद्रहास शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या वेळी श्याम खंडेलवाल, सतीश राजहंस, दिनकर शिलेदार, डॉ. गौरी दामले उपस्थित होते. हा कार्यक्रम १९ नोव्हेंबर २०१८ रोजी कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे होणार आहे.

डॉ. परवेज ग्रांटया विषयी अधिक माहिती देताना शेट्टी म्हणाले, ‘अवयवदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी व मधुमेहाबाबत जनजागृती करण्यासाठी सकाळी आठ वाजता रॅली काढण्यात येणार आहे. ही रॅली कोथरूड येथील सिटीप्राइड थिएटर ते यशवंतराव चव्हाण नाट्यगृह अशी निघणार असून, त्याचे उद्घाटन पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक व खासदार अनिल शिरोळे यांच्या हस्ते होणार आहे. या रॅलीत विद्यार्थी, खेळाडू, मधुमेह रुग्ण, ज्येष्ठ नागरिक, डॉक्टर्स, नागरिक आणि लायन्स सदस्य सहभागी होणार आहेत.’

डॉ. संजय पाठारे‘सोमवारी सकाळी १० ते १२.३० या वेळेत मधुमेह व अवयवदान या विषयावर तज्ज्ञ मार्गदर्शन करतील. यामध्ये इन्शुलिनविषयी समज-गैरसमज, मधुमेहाबाबत घ्यायची काळजी, लहान मुलांमधील मधुमेहाची कारणे व दक्षता, मधुमेहींसाठी आहार, अवयवदान जागृती व तणावमुक्त जीवन कसे जगावे या विषयांचा समावेश आहे. त्यानंतर दुपारी १२ ते तीन या वेळेत याच ठिकाणी मधुमेहासंबंधी तपासण्या पूर्णतः मोफत करण्यात येणार आहेत,’ असे शेट्टी यांनी सांगितले.

या कार्यक्रमासाठी माजी मंत्री शशिकांत सुतार, प्रांतपाल रमेश शहा, धारिवाल फाउंडेशनच्या शोभा रसिकलाल धारिवाल, उपप्रांतपाल लायन ओमप्रकाश पेठे, लायन अभय शास्त्री, माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, मोहन जोशी, नगरसेवक मुरलीधर मोहोळ, पृथ्वीराज सुतार, दिलीप वेडे पाटील, मंजुश्री खर्डेकर आदी उपस्थित राहणार आहेत.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search