Next
पुणे येथे वक्तृत्व स्पर्धेच्या विभागीय फेरीचे आयोजन
यशवंत शब्दगौरव राज्यस्तरीय महाविद्यालयीन स्पर्धा
प्रेस रिलीज
Monday, July 08, 2019 | 04:36 PM
15 0 0
Share this article:

पुणे : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, नवमहाराष्ट्र युवा अभियान व रयत शिक्षण संस्थेचे एस. एम. जोशी कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी यशवंत शब्दगौरव महाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा विभागीय व अंतिम अशा दोन फेर्‍यांमध्ये घेण्यात येणार आहे. मुंबई, नागपूर, पुणे, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद, नांदेड, अमरावती, चिपळूण या नऊ शहरांमध्ये विभागीय फेरी होणार आहे. 

पुण्यात २७ ऑगस्ट २०१९ सकाळी १० वाजता माळवाडी-हडपसर येथील रयत शिक्षण संस्थेचे एस. एम. जोशी कॉलेज येथे विभागीय फेरी होणार आहे. यामध्ये पुणे, सोलापूर व अहमदनगर या तीन जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांना सहभाग नोंदविता येईल. विभागीय फेरीच्या स्पर्धेसाठी ‘भारतीय लोकशाही व निवडणूक व्यवस्था’, ‘यशवंतराव चव्हाण यांची कारकीर्द : शोध आणि बोध’, ‘महाराष्ट्राच्या महिला धोरणाची २५ वर्षे’, ‘जातींचं काय करायचं? व्यवस्थापक की निर्मूलन?’, ‘सोशल मीडिया : मी आहे नेहमी ऑनलाइन!’ हे विषय असतील. 

प्राथमिक फेरीतील प्रथम तीन क्रमांक विजेत्यांस अनुक्रमे पाच हजार रुपये, तीन हजार, दोन हजार आणि प्रत्येकी स्मृतिचिन्ह व उत्तेजनार्थ दोन विजेत्यांना एक हजार रुपये व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेची अंतिम फेरी १८ सप्टेंबर २०१९ रोजी मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या रंगस्वर सभागृहात होणार आहे. अंतिम फेरीसाठी अनुक्रमे पंधरा हजार रुपये, दहा हजार, सात हजार, तीन हजार व प्रत्येकी स्मृतिचिन्ह (दोन विजेते) अशी प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ क्रमांकाची पारितोषिके असतील. 

स्पर्धेसाठी प्रवेश विनामूल्य असून, नाव नोंदणीची अंतिम तारीख २२ ऑगस्ट २०१९ आहे. इच्छुक स्पर्धकांनी स्पर्धेच्या या वेबसाइटवर अथवा मेल आयडीवर, तसेच मोबाइल क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन विभागीय केंद्राचे अध्यक्ष अजित निंबाळकर, सचिव अंकुश काकडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरविंद बुरुंगले, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई नवमहाराष्ट्र युवा अभियानचे राज्यसंघटक नीलेश राऊत, डॉ. अमित नागरे आदींनी केले आहे.

अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी वेबसाइट : www.ycpmumbai.com 
ई-मेल : navmaharastra@gmail.com 
संपर्क क्रमांक : 
डॉ. अमित नागरे : ८६०५२ १००५२ 
डॉ. प्रभंजन चव्हाण : ९५२७१ ९२७१५ 
डॉ. पांडुरंग भोसले : ९४२३५ ५५०३८ 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search