Next
ठाणे जिल्ह्यात निवडणुकीसाठी दोन हजार गाड्यांचा ताफा
BOI
Tuesday, March 19, 2019 | 05:08 PM
15 0 0
Share this article:

ठाणे : लोकसभा निवडणुकीची धामधूम सर्वत्र सुरू झाली असून, प्रशासकीय पातळीवरही कामाला वेग आला आहे. ठाणे जिल्हा प्रादेशिक परिवहन विभागही कामाला लागला असून, ठाणे जिल्ह्यातील ठाणे, भिवंडी, कल्याण लोकसभा मतदारसंघांच्या निवडणुकीसाठी या विभागामार्फत सुमारे दोन हजार वाहनांचा ताफा तैनात ठेवावा लागणार आहे. 

जिल्ह्यातील महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदेची मिळून सुमारे १५० वाहने प्रादेशिक परिवहन विभागाकडे जमा झाली आहेत.

ठाणे जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघांसाठी लागणाऱ्या सुमारे दोन हजार गाड्या जमविण्याची व्यवस्था ठाणे प्रादेशिक परिवहन विभागावर सोपविण्यात आली आहे. त्यानुसार या विभागाकडून गाड्यांची जुळवाजुळव सुरू करण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यातील सहा महानगरपालिकांसह सर्व नगरपालिका, ग्रामपंचायती यांच्या ताफ्यात असलेल्या १२३ गाड्या आतापर्यंत परिवहन विभागाने ताब्यात घेतल्या आहेत;तसेच निवडणुकीच्या कामासाठी सुमारे ८३० बसेस, १०५ कार आणि मतपेट्यांसाठी (ईव्हीएम मशीन) ११५९ जीप्स इत्यादी खासगी वाहनांचीही आवश्यकता भासत असल्याने त्यांचीही जुळवाजुळव केली जात आहे. 

उमेदवारांच्या प्रचारासाठी लागणारे रथ, प्रचारात असलेल्या गाड्यांची नोंदणी करण्याची तयारीही या विभागाकडून करण्यात आली आहे. निवडणुकीच्या कामात अडथळा येऊ नये, विनाविलंब काम व्हावे यासाठी परिवहन विभागाने कंबर कसली असून, अतिरिक्त कर्मचारीही नियुक्त करण्यात आले आहेत. अशी माहिती परिवहन विभागाने दिली आहे.      
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search