Next
‘संघा’च्या संभाजी भागातर्फे शस्त्रपूजन उत्साहात
प्रेस रिलीज
Tuesday, October 16 | 12:08 PM
15 0 0
Share this storyपुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संभाजी भागाचा विजयादशमी उत्सव नुकताच उत्साहात झाला. यानिमित्ताने शस्त्रपूजन करण्यात आले. या उत्सवासाठी अखिल भारतीय धर्मजागरणचे संयोजक शरदराव ढोले हे प्रमुख वक्ते म्हणून, तर सीड इन्फोटेकच्या संचालिका भारती जावळे-बऱ्हाटे या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या.

या वेळी पुणे महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर व संभाजी भाग संघचालक दिगंबर परूळेकर हे व्यासपीठावर होते. शस्त्र पूजन झाल्यानंतर स्वयंसेवकानी सामूहिक समता, नियुद्ध, दंड युद्ध-दंड प्रहार, पदविन्यास, घोष, योग ही प्रात्यक्षिके सादर केली.

या प्रसंगी बोलताना भारती जावळे-बऱ्हाटे म्हणाल्या, ‘संघाच्या व्यासपीठावर पहिल्यांदाच बोलताना आनंद होत आहे. भारत हा आज जगातील एक तरूण देश आहे. तरूणांची संख्या मोठी असली त्यांना शिस्त लावण्याची, संस्कार देण्याची गरज आहे. संघ ते काम खूप चांगल्या रितीने करत आहे. आज पदवीधर होणाऱ्यांची संख्येपैकी १५ टक्के लोक नोकरी मिळण्यायोग्य आहेत. उर्वरित ८५ टक्के पदवीधर हे नोकरीसाठी अपात्र ठरत आहेत. त्यांनी आपल्या क्षमतांचा विकास करून नोकरीस पात्र होण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी स्कील डेव्हलपमेंट करणे आवश्यक आहे. पाश्चात्यांचे अंधपणे अनुकरण करण्यापेक्षा आपल्या भारतीय कलांचे, कौशल्यांचे चिंतन करून त्याप्रमाणे क्षमता वाढवणे आवश्यक आहे.’

प्रमुख वक्ते ढोले मार्गदर्शन करताना म्हणाले, ‘संघाची हिंदूत्वाची भूमिका नुकतीच सरसंघचालक यांनी स्पष्ट केली. संघाची एक राष्ट्रनीती आहे, त्या नीतीला अनुसरून निर्णय घेणारे प्रत्येक सरकार हे संघाचे सरकार आहे. त्यामुळे फक्त भारतीय जनता पक्षाचेच नाही, तर या पूर्वीचीही सर्व सरकारे आमचीच होती. संघाची शाखा बघायला, अनुभवायला येणाऱ्याचा संघाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो आहे. आज एकही असे क्षेत्र नाही ज्याबद्दल संघाचे मत काय ही विचारणा होत नाही. कोणत्याही क्षेत्रात तुम्हाला काम करायचे असेल ज्या भागात ते तुमची करायची इच्छा असेल संघ तुम्हाला स्वयंसेवक जोडून देईल.’

‘समाजजीवन पुष्ट होण्यासाठी संघ काम करतो. देशातील व्यवस्था परीवर्तनाचे नेतृत्व संघाने करावे, अशी समाजाची अपेक्षा आहे. हिंदू समाजमन चेतवण्याचे काम संघ गेली ९० वर्षे करत आला आहे आणि यापुढेही करत राहील. समाजातील सज्जन शक्तीच्या व सम्यक क्रांतीच्या आधारे संघ हे काम करेल. विवेकानंद, अरविंद, बंकीम यांनी हिंदू धर्माबद्दल जे चिंतन व्यक्त केले ते निर्माण करायची कार्यपद्धती डॉ. हेडगेवार यांनी संघाच्या माध्यमातून घालून दिली. ही कार्यपद्धत समजून धेण्यासाठी संघ शाखेवर या आणि संघकार्यात सहभागी व्हा.’

या उत्सवामध्ये भाजप शहराध्यक्ष योगेश गोगावले, नगरसेवक जयंत भावे, दीपक पोटे, दिलीप वेडे पाटील, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, माधुरी सहस्रबुद्धे, श्रद्धा प्रभुणे, माजी नगरसेवक शाम देशपांडे, शिवराम मेंगडे यांबरोबर संदीप खर्डेकर उपस्थित होते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link