Next
हदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी श्यामराव चव्हाण
उपसभापती विशाल परभणकर यांची निवड
नागेश शिंदे
Thursday, January 10, 2019 | 05:24 PM
15 0 0
Share this article:



हिमायतनगर : संपूर्ण नांदेड जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या हदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी अखेर शिवसेनेचे श्यामराव चव्हाण यांची वर्णी लागली, तर भारतीय जनता पक्षाचे (भाजप) विशाल परभणकर यांची उपसभापतीपदी निवड झाल्याचे घोषित करण्यात आले.

हदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदासाठी अत्यंत चुरस होती. या निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप युतीचे नऊ, काँग्रेसचे आठ आणि अपक्ष एक असे पक्षीय बलाबल होते. शेवटी निवडणूक आयोगाने चिठ्ठी टाकून सभापती निवड करण्याचा निर्णय घेतला. यात श्यामराव चव्हाण यांची सभापतीपदी, तर भाजपचे विशाल परभणकर यांची उपसभापतीपदी निवड झाल्याचे घोषित करण्यात आले.



मागील काळात हिमायतनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष निवडीच्या वेळेस काँग्रेस नेत्यांनी चुकीच्या माणसाला परत उमेदवारी दिल्यामुळे काँग्रेसला तेथील सत्ता गमवावी लागली आणि आता हदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीही युतीच्या ताब्यात गेल्याने हदगाव-हिमायतनगर मतदारसंघातील काँग्रेस पक्षाची हवा आता हळुहळु कमी होत असल्याचे दिसून येत आहे. हदगाव आणि हिमायतनगर या दोन्ही तालुक्यांत झालेल्या सत्ता परिवर्तनाचा येणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला काही अंशी फटका बसणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.



हदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी चव्हाण व उपसभापती परभणकर यांची निवड झाल्याबद्दल हदगाव-हिमायतनगर तालुक्याचे आमदार नागेश आष्टीकर,  जिल्हाप्रमुख बाबुराव कदम यांच्यासह अनेक पदाधिकारी व शिवसेना-भाजप युतीच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन करत जल्लोष साजरा केला. या वेळी हिमायतनगरचे जेष्ठ शिवसैनिक विठ्ठल ठाकरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गजानन तुप्तेवार, शिवसेना तालुकाप्रमुख रामभाऊ ठाकरे, विलास वानखेडे, प्रसाद डोंगरगावकर, गजानन पाळजकर, युवासेना तालुकाप्रमुख विशाल राठोड, मंगेश धुमाळे, पापा शिंदे, गजानन वानखेडे, दुर्गेश मंडोजवार आदी मान्यवर उपस्थित होते.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search