Next
पुण्यात ‘माधुर्य मधुरता’ कार्यक्रमाचे आयोजन
प्रेस रिलीज
Monday, December 17 | 03:17 PM
15 0 0
Share this story

पुणे : स्वरसम्राट मोहम्मद रफी यांच्या जन्मदिनानिमित्त महक व म्युझिक इंडिया यांच्या वतीने ‘माधुर्य मधुरता’ या सदाबहार गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्यांच्या गायनात माधुर्य आणि मधुरता आहे, अशा मोहम्मद रफी आणि स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या युगुलगीतांची मैफल २१ डिसेंबर २०१८ रोजी सायंकाळी पाच वाजता कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात ही रंगणार आहे.

प्रसिद्ध गायिका मनीषा निश्चल आणि गफार मोमीन हे या कार्यक्रमात सादरीकरण करणार आहेत. संदीप पंचवाटकर हे या मैफलीचे निवेदन करतील. मनीषा आणि गफार यांनी या आधीही आपल्या गायन कौशल्यातून रसिकांना मंत्रमुग्ध केले आहे. ‘माधुर्य मधुरता’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने या दोघांना पुन्हा एकदा ऐकण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे.

मनीषा निश्चलगफार मोमीनया कार्यक्रमाचे संगीत संयोजन सईद खान करणार आहेत.

मैफलीविषयी :
दिवस :
शुक्रवार, २१ डिसेंबर २०१८
वेळ : सायंकाळी पाच वाजता
स्थळ : यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड, पुणे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link