Next
पुणेकरांसमोर पुन्हा एकदा येणार ‘चिमणराव ते गांधी’
BOI
Monday, December 03 | 02:15 PM
15 0 0
Share this story


पुणे : चतुरस्र अभिनेते दिलीप प्रभावळकर यांचा ‘चिमणराव ते गांधी’ टॉक शो पुन्हा एकदा पुणेकरांच्या भेटीला येत आहे. पुण्यातील हिंदू महिला सभा यांच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या अनेकविध समाजोपयोगी प्रकल्पांना आर्थिक मदत करण्यासाठी या टॉक शोचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या शनिवारी, आठ डिसेंबर रोजी बालगंधर्व रंगमंदिर येथे सायंकाळी पाच वाजता हा कार्यक्रम होणार असून, त्यासाठी देणगी प्रवेशिका असणार आहेत.

‘चिमणराव ते गांधी’ या कार्यक्रमात दिलीप प्रभावळकरांच्या नाटके, चित्रपट, मालिका या माध्यमातील गाजलेल्या भूमिका प्रेक्षकांसमोर रेकॉर्डेड आणि लाईव्ह असे दोन्ही प्रकारात सादर करण्यात येणार आहेत. याबरोबरच नाटके, चित्रपट आणि मालिकांमधील आपल्या विविध भूमिकांबद्दल स्वत: दिलीप प्रभावळकर उपस्थितांशी संवाद साधतील. त्यांना स्वत:ला भावलेल्या काही व्यक्तिरेखांचे सादरीकरणदेखील ते या वेळी सादर करतील. त्यांच्या काही दुर्मिळ चित्रफितीदेखील या कार्यक्रमामध्ये दाखविण्यात येतील.

या कार्यक्रमाच्या देणगी प्रवेशिकांमधून येणारी रक्कम ही हिंदू महिला सभेतर्फे करण्यात येत असलेल्या अनेक समाजोपयोगी कार्यक्रमांसाठी वापरण्यात येईल. ज्यामधून समाजातील अपंग, अनाथ, वृद्ध, अंध यांना मदत करण्यात येईल.

कार्यक्रमाविषयी 
चिमणराव ते गांधी 
स्थळ : बालगंधर्व रंगमंदिर, 
वेळ : शनिवार, ८ डिसेंबर, सायंकाळी ५ वाजता. 

(हिंदू महिला सभेच्या कार्यासंदर्भातील अन्य बातम्यांसाठी येथे क्लिक करा.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link