Next
‘पत्र निमित्तमात्र’चा पहिला प्रयोग शनिवारी पुण्यात
जी. ए. आणि सुनीताबाई यांच्यातील पत्रसंवादाची पहिली अभिवाचन मालिका
BOI
Friday, July 12, 2019 | 03:40 PM
15 0 0
Share this article:


पुणे :   मराठी साहित्यविश्वात आपली वेगळी ओळख निर्माण करणारे लेखक जी. ए. कुलकर्णी आणि सुनीता देशपांडे यांच्यातील पत्रसंवादावर आधारित असलेली ‘पत्र निमित्तमात्र’ ही अभिवाचनाची १२ भागांची मालिका शनिवारपासून (१३ जुलै) सादर करण्यात येणार आहे. अभिवाचनाची मालिका सादर करण्याचा हा पहिलाच प्रयोग आहे.

शुभांगी दामले आणि धीरेश जोशी
‘या अभिवाचन मालिकेची संकल्पना वैशाली कणसकर यांची असून, धीरेश जोशी आणि शुभांगी दामले अभिवाचन करणार आहेत. शनिवारी,१३ जुलै रोजी सुदर्शन रंगमंच येथे सायंकाळी सात वाजता या मालिकेतील पहिला भाग सादर होईल.  जुलै २०१९ ते डिसेंबर २०१९ या कालावधीत दर महिन्याला दोन प्रयोग असे एकूण १२ भाग सादर करण्यात येणार आहेत. एक ते सव्वा तासाचा कार्यक्रम आहे. नेपथ्य श्रीकांत प्रभाकर यांचे, तर निखिल गाडगीळ यांनी प्रकाशयोजना केली असून, गौरी दामले यांची चित्रे आहेत’, अशी माहिती या मालिकेचे दिग्दर्शक आणि ‘रंगभाषा’ संस्थेचे अमृत सामक यांनी दिली.

वैशाली कणसकर
‘सुनीताबाई आणि जी. ए. कुलकर्णी यांच्यातील पत्रसंवाद जवळपास आठ वर्षे सुरू होता. अनेक विषयांवर त्यांनी एकमेकांना ६० पत्रे लिहिली. नेहमीच्या पत्रांपेक्षा ही पत्रे वेगळी होती. या पत्रांमध्ये विविध साहित्यकृती, लेखक, त्यांचे लेखन यावर चर्चा असे. त्यामुळेच या पत्रांमध्ये नाट्यमयता आहे. हे नाट्य रंगमंचावर आणण्याचा विचार होता. त्याकरिता ‘प्रिय, जीए’ आणि ‘जीएंची निवडक पत्रे : खंड एक’ या पुस्तकांचा संदर्भ घेतला. अभ्यासपूर्वक याची मांडणी केली. यातील साहित्यमूल्य लक्षात घेता, एखाद्या कार्यक्रमात अभिवाचन करून ते संपवण्यापेक्षा मालिकेच्या स्वरूपात साकारण्याची संकल्पना पुढे आली. त्यामुळे त्यांच्या पुस्तकांचे हक्क आणि मालिकेसाठीची परवानगी मिळवली आणि आता ही १२ भागांची अभिवाचन मालिका रसिकांसमोर येण्यास सज्ज आहे,’ असे दिग्दर्शक अमृत सामक यांनी स्पष्ट केले.  
 
अमृत सामक
कार्यक्रमाविषयी :

‘पत्र निमित्तमात्र’ 
जी. ए. कुलकर्णी आणि सुनीता देशपांडे यांच्यातील पत्रसंवादावर आधारित अभिवाचन  
दिवस व वेळ : शनिवार,१३ जुलै, सायंकाळी सात वाजता 
स्थळ : सुदर्शन रंगमंच 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search