Next
सागर खळदकर यांना ‘क्रीडा मार्गदर्शक’ पुरस्कार
प्रेस रिलीज
Tuesday, March 12, 2019 | 01:14 PM
15 0 0
Share this story

‘कोथरूड भूषण’ पुरस्कार विजेते कबड्डी प्रशिक्षक सागर खळदकर यांना पुणे महानगरपालिकेचा ‘कै. बाबुराव दगडू गायकवाड क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार’   महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

पुणे : ‘कोथरूड भूषण’ पुरस्कार विजेते कबड्डी प्रशिक्षक सागर खळदकर यांना पुणे महानगरपालिकेचा ‘कै. बाबुराव दगडू गायकवाड क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार’   महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार प्रदान कार्यक्रम नुकताच कोथरूड क्षेत्रीय कार्यालय येथे पार पडला. 

‘गेल्या पाच वर्षांपासून कोथरूडमधील कला, क्रीडा, मनोरंजन क्षेत्रात कामगिरी करणाऱ्या गुणवंताना ‘अखिल वनाज कॉर्नर दहीहंडी उत्सव समिती ट्रस्ट’च्या वतीने ‘कोथरूड भूषण’ या पुरस्काराने गौरविण्यात येते. होतकरू कलाकार, खेळाडू यांना प्रोत्साहन देण्यासाठी हा पुरस्कार सुरू केला आहे,’ अशी माहिती ट्रस्टचे संस्थापक राहुल म्हस्के यांनी दिली. 

‘क्रीडा क्षेत्रातील कार्याची दखल घेत ‘कोथरूड भूषण’ पुरस्कार मिळाला. या पुरस्कारामुळे अपंगत्व येऊनही पाच शाळांमध्ये कबड्डी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती मिळाली. माझ्या या कामाची दखल घेऊन पालिकेचा हा पुरस्कारदेखील मिळाला. ‘अखिल वनाज कॉर्नर दहीहंडी उत्सव समिती ट्रस्ट’चा मी ऋणी आहे. समाजात काहीतरी करू इच्छिणाऱ्या, परिस्थितीशी झगडणाऱ्या गुणवंत कलावंताना ट्रस्ट पुरस्कार देते हे अभिमानास्पद कार्य आहे,’ अशी प्रतिक्रिया सागर खळदकर यांनी व्यक्त केली.   

 सागर खळदकर‘सागर खळदकर हे उत्तम कबड्डीपटू, अनेक राष्ट्रीय स्पर्धांमध्ये त्यांनी चमकदार कामगिरी केली; पण पॅरालिसिससारख्या आजाराने त्यांना जखडले. परंतु, खचून न जाता प्रतिकूलतेवर मात करून इतरांना प्रशिक्षण देण्याचे काम त्यांनी सुरू केले. भारती विद्यापीठातील अभिजितदादा कदम कबड्डी संघाला प्रशिक्षण दिले. जिल्हा, राज्य, विद्यापीठ स्तरावर उत्तम कामगिरी करणारे खेळाडू घडवले. त्यांच्या प्रशिक्षणामुळे काही खेळाडूंची आर्मी, पोलीस क्षेत्रात निवड झाली. खेळाडू घडविण्याच्या त्यांच्या कामगिरीसाठी २०१८ मध्ये त्याला ‘कोथरूड भूषण’ पुरस्काराने गौरविण्यात आले होते. कबड्डी प्रशिक्षक सागर खळदकर यांना पुणे महानगरपालिकेचा ‘कै. बाबुराव दगडू गायकवाड क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार’ मिळाला ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे,’ अशी भावना ‘अखिल वनाज कॉर्नर दहीहंडी उत्सव समिती ट्रस्ट’चे संस्थापक अध्यक्ष गिरीश गुरनानी यांनी व्यक्त केली.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link