Next
‘अग्रवाल’तर्फे सौंदर्यवर्धक शस्त्रक्रिया शिबीर
प्रेस रिलीज
Thursday, March 08, 2018 | 10:26 AM
15 0 0
Share this story

शिबिराविषयी माहिती देताना डावीकडून राजन कांदोई, राजेश टेकरीवाल, विजय मित्तल, डॉ. पंकज जिंदाल, राजीव अग्रवाल व लक्ष्मीकांत चामडीया.पुणे : ‘अग्रवाल क्लब चॅरिटेबल ट्रस्टतर्फे प्लास्टिक, कॉस्मेटिक अँड हँड सर्जरी (सौंदर्यवर्धक आणि हाताची शस्त्रक्रिया) शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर मोफत असून, १८ मार्च २०१८ रोजी ऑर्किड हॉस्पिटल येथे होणार आहे,’ अशी माहिती प्रसिद्ध हँड सर्जन डॉ. पंकज जिंदल आणि ‘अग्रवाल’चे अध्यक्ष विजय मित्तल यांनी दिली.

या वेळी संस्थेचे राजीव अगरवाल, उमेश जालान, राजेश टेकरीवाल, लक्ष्मीकांत चामडीया, राजेंद्र अग्रवाल व राजन कांदोई यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

मित्तल म्हणाले, ‘शिबिराचे हे सातवे वर्ष आहे. आतापर्यंत या शिबिरास चांगला प्रतिसाद मिळाला आहे. डॉ. पंकज जिंदल आणि प्लास्टिक सर्जरीतज्ज्ञ डॉ. शंकर श्रीनिवासन सुब्रह्मण्यम व सहकारी या शिबिरात शस्त्रक्रिया करणार आहेत. वाकड्या नाकात सुधारणा, हनुवटीच्या आकारात बदल, गोंदण, मस व चेहऱ्यावरील व्रण, जन्मतः असलेले व्यंग, दुभंगलेले ओठ, वाकडी बोटे, जळलेले व्यंग,  भाजल्यामुळे येणारे व्यंग, अपघाताने आलेल्या विकृती आदी गोष्टींवर प्लास्टिक व कॉस्मेटिक सर्जरी करण्यात येणार आहे. स्त्री व मुलींना प्राधान्य देण्यात येणार असून, गरजू रुग्णांनी या संधीचा लाभ घ्यावा.’

या प्लास्टिक सर्जरी शिबिरासाठी प्रमुख पाहुणे म्हणून वडगाव शेरी मतदारसंघाचे आमदार जगदीश मुळीक आणि देवकीनंदन मोहनलाल अग्रवाल हे उपस्थित राहणार आहेत. गरजू रुग्णांनी सर्जरी पूर्व तपासणीसाठी १८ मार्च २०१८ रोजी सकाळी ८ वाजता उपाशी पोटी हजार राहावे; तसेच १५ मार्च २०१८पर्यंत नावनोंदणी करणे आवश्यक आहे.

शिबिराविषयी :

दिवस : रविवार, १८ मार्च २०१८
वेळ : सकाळी आठ वाजल्यापासून
स्थळ : ऑर्किड हॉस्पिटल, एल स्क्वेअर बिल्डिंग, पोरवाल रोड, धानोरी जकात नाक्याजवळ, लोहगाव, पुणे.
अधिक माहितीसाठी संपर्क :
वंदना पाठक - ७५८८१ ४८८०५
निर्मला मित्तल - ९०११० ०७६६९
ऑर्किड हॉस्पिटल - ७५०७२ ४७२४७ 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link