Next
नारळ काढण्याच्या शिडीला पेटंट; कोल्हापुरातील महामुनी यांची निर्मिती
BOI
Saturday, August 18, 2018 | 04:08 PM
15 0 0
Share this article:

कोल्हापूर : जयसिंगपूर येथील प्रयोगशील उद्योजक सुनील महामुनी यांनी विकसित केलेल्या नारळ काढणी शिडीला केंद्र सरकारकडून पेटंट मंजूर झाले आहे. नारळ आणि सुपारीच्या झाडावर चढून सुरक्षितपणे काढणी, फवारणी आणि स्वच्छता करण्याच्या उद्देशाने महामुनी यांनी ही शिडी विकसित केली आहे. आतापर्यंत शेकडो शेतकरी, शेतमजुरांना या शिडीचा उपयोग झाला आहे.

सुनील महामुनी गेली १५ वर्षे कृषी उपकरणांच्या व्यवसायात कार्यरत आहेत. त्यांनी अतिशय कल्पकतेने ही नारळ काढणी शिडी विकसित केली आहे. आजवर कसबी मजूर झाडावर चढून नारळ काढत असत; मात्र ते धोकादायक असे. यावर उपाय म्हणुन महामुनी यांनी पॅडलच्या साह्याने झाडावर सहजपणे चढ-उतार करता येईल, अशी योजना या शिडीमध्ये केली आहे. यामध्ये पॅडल सिस्टिम, रबरी हँडल ग्रिप, वायर रोप आणि सेफ्टी बेल्ट आहे. त्यामुळे या शिडीचा वापर करून शेतकरी, शेतमजूर, महिला आणि मुले-मुलीसुद्धा सहजपणे नारळाच्या झाडावर चढू शकतात.

महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोव्यातील अनेक शेतकरी ही शिडी वापरून नारळ, सुपारीची काढणी करतात. तसेच नारळ, सुपारी काढणीचे काम पूर्ण वेळ करणाऱ्या मजुरांना या शिडीच्या माध्यमातून स्वयंरोजगार मिळाला आहे. केरळ विद्यापीठाने तयार केलेल्या पारंपारिक शिडीपेक्षा ही शिडी नावीन्यपूर्ण आणि सुरक्षित आहे. केंद्र सरकारच्या पेटंट विभागाने या शिडीला पेटंट मंजूर केले असून, त्याचा मंजुरी क्रमांक २९९८२९ असा आहे

याबाबत सुनील महामुनी म्हणाले, ‘आम्ही विकसित केलेली नारळ काढण्याची शिडी नावीन्यपूर्ण आणि नारळ काढणीतील जोखमीचा विचार करून सुरक्षित आणि दणकट बनविलेली आहे. यामुळे नारळाच्या वाकड्या-तिकड्या झाडावर पावसाळ्यातसुद्धा सहजपणे आणि बिनधोक चढता येते. गेली काही वर्षे आम्ही पेटंट मिळवण्यासाठी प्रयत्नशील होतो. अखेर केंद्र सरकारच्या विविध चाचण्या झाल्यावर आम्हाला आता पेटंट मिळाले आहे. यामुळे आमचा आत्मविश्वास वाढला आहे. आमचे हे उत्पादन एकमेवाद्वितीय असल्याचे आता सिद्ध झाले आहे.’

‘नजीकच्या काळात आम्ही गुजरात, ओडिशा, केरळ, त्रिपुरा या राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही शिडी उपलब्ध करणार आहोत,’ असेही महामुनी यांनी सांगितले.

संपर्क : ०८०४८० ०६८७८
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
BDGramopadhye About 28 Days ago
Because of the patent , it may be possible to enter International markets . Their are organisation which specialize in this field . Good luck .
0
0
Sumukh Aroskar About 301 Days ago
Great Idea
0
0

Select Language
Share Link
 
Search