Next
दी ग्रेट गेम
BOI
Friday, November 16, 2018 | 10:07 AM
15 0 0
Share this story

पहिल्या महायुद्धानंतर अरबस्तानातील ऑटोमन साम्राज्य लयाला गेले व अनेक नवे देश निर्माण झाले. मध्य पूर्वेस १९१७ नंतर इस्राईल, सौदी अरेबिया, जॉर्डन, सिरीया, इराक असे देश उदयाला आले. रशियाला अफगाणिस्तानमार्गे हिंदुस्तानात येण्यापासून रोखण्यासाठी ब्रिटिशांनी अफगाणिस्तानविरोधात तीन युद्धे लढली. तिसरे युद्ध १९१९मध्ये झाले आणि त्यात अफगाणचा विजय झाला. यानंतर अफगाणांनी भारतावर रशियाच्या छुप्या मदतीने हल्ला केला. याचा उल्लेख ‘दी ग्रेट गेम’ याच नावाच्या पुस्तकातून प्रकाश टाकला आहे.

या काळात ब्रिटन, अमेरिका, रशिया, जपान, जर्मनी या देशांमधील स्थिती, मध्य पूर्वेतील राष्ट्रांमधील रक्तरंजित उठाव, ‘सिक्रेट सर्व्हिस इंटलिजन्स’ (एसआयएस) म्हणजेच सध्याची ‘एमआय ६’ ही संघटना, सौदी अरेबियाचे एकत्रीकरण आदी घडामोडींचे नाट्य उलगडले आहे; तसेच सौदीचे संस्थापक, ‘दी फर्स्ट किंग ऑफ इराक’ अशी ओळख असलेले किंग फैजल व ‘लॉरेन्स ऑफ अरेबिया’ थॉमस ई लॉरेन्स अशा व्यक्तींचे चित्रण केले आहे.     

प्रकाशन : परम मित्र पब्लिकेशन
पृष्ठे : २८१
मूल्य : ४०० रुपये

(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)


 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link