Next
गदिमांच्या जन्मशताब्दीनिमित्त ‘मसाप’तर्फे विशेष कार्यक्रम
‘पुत्र सांगती’ या कार्यक्रमात माडगूळकर बंधूंशी गप्पा
BOI
Tuesday, October 02 | 05:05 PM
15 0 0
Share this story

पुणे : महाराष्ट्र वाल्मिकी ग. दि. माडगूळकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने ‘मसाप गप्पा’ या उपक्रमात ‘पुत्र सांगती...’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात गदिमांचे सुपुत्र श्रीधर माडगूळकर, आनंद माडगूळकर आणि शरतकुमार माडगूळकर गदिमांच्या आठवणींना उजाळा देणार आहेत. प्रसिद्ध निवेदक अरुण नूलकर त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. 

या कार्यक्रमाला मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम मंगळवारी, ८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६.१५ वाजता मसापच्या माधवराव पटवर्धन सभागृहात होणार आहे. 

कार्यक्रमाविषयी 
मसाप गप्पा  
‘पुत्र सांगती...’ कार्यक्रमात गदिमांविषयी गप्पा
स्थळ : माधवराव पटवर्धन सभागृह, महाराष्ट्र साहित्य परिषद
वेळ :  मंगळवार, ८ ऑक्टोबर, संध्याकाळी ६.१५ वाजता.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link