Next
डॉ. आंबेडकर महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा
प्रेस रिलीज
Tuesday, January 29, 2019 | 05:20 PM
15 0 0
Share this storyऔंध : येथील रयत शिक्षण संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात ७०वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून रयत शिक्षण संस्थेच्या पश्चिम विभागाचे चेअरमन राम कांडगे उपस्थित होते.

त्याचप्रमाणे रयत शिक्षण संस्थेचे विभागीय अधिकारी किसन रत्नपारखी, सहायक विभागीय अधिकारी शंकर पवार, मुख्याध्यापक अरविंद जाधव, रयत बँकेचे शाखाधिकारी श्री. अल्हाट, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मंजुश्री बोबडे, उपप्राचार्य डॉ. विलास सदाफळ उपस्थित होते.कांडगे यांनी रयत शिक्षण संस्थेला १०० वर्षे पूर्ण झाली असून, आजपर्यंत संस्थेने रयतेच्या हिताच्या दृष्टीने नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले असल्याचे सांगून पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, ‘कर्मवीर आण्णांनी समाजातील वंचित मुला-मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणले. आपले संपूर्ण आयुष्य समाजासाठी चंदनाप्रमाणे झिजवले. तरुण मुला-मुलींनी कर्मवीर अाण्णा आणि रयत माऊली लक्ष्मीबाई पाटील यांचा आदर्श घेऊन वाटचाल करावी.’महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. बोबडे म्हणाल्या, ‘महाविद्यालयातील तरुण मुले-मुली या देशाची संपत्ती आहेत. डॉ. एपीजे अब्दुल कलाम म्हणाले होते की, ‘भारत देश हा जगात महासत्ता होईल. तो केवळ तरुणांमुळेच.’ त्यामुळे तरुण मुला-मुलींना चांगले शिक्षण देण्याचे कार्य संस्थेच्या माध्यमातून आम्ही सर्व प्राध्यापक करीत आहोत. मुलांना पारंपारिक शिक्षणाबरोबर व्यवसायिक शिक्षण मिळावे. म्हणून ७०व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयामध्ये उद्योजकता विकास केंद्र सुरू करण्यात येणार आहे. या केंद्रातर्फे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना उद्योजक होण्याचे धडे देण्यात येणार आहेत. यासाठी रवींद्र पित्रे मार्गदर्शन करतील. विद्यार्थ्यांनी चांगला उद्योग व्यवसाय सुरू करून, इतरांना काम करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी. यासाठी हे केंद्र विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहे.’या वेळी महाविद्यालयातील सांस्कृतिक विभागाने देशभक्तीपर गीतांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनात देशप्रेम निर्माण केले. महाविद्यालयातील बीबीए विभागातर्फे नाविन्यपूर्ण पोस्टर प्रेझेंटेशन करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन रयत शिक्षण संस्थेच्या पश्चिम विभागाचे चेअरमन कांडगे यांनी केले.

या प्रसंगी डॉ. सुहास निंबाळकर, डॉ. सविता पाटील, प्रा. सुप्रिया पवार, प्रा. एकनाथ झावरे, डॉ. तानाजी हातेकर, प्रा. मयुर माळी, प्रा. गौरी पवार, प्रा. हर्षद जाधव, प्रा. कुशल पाखले, प्रा. आसावरी शेवाळे, प्रा. शशी कराळे, डॉ. अतुल चौरे उपस्थित होते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link