Next
पहिला रानगंध पुरस्कार अनुराधा पाटील यांना जाहीर
BOI
Wednesday, September 12 | 06:35 PM
15 0 0
Share this story

कवयित्री अनुराधा पाटील
ठाणे : ‘येथील आर. जी. इंडस्ट्रीजच्या वतीने कविवर्य ना. धों. महानोर यांच्या सन्मानार्थ आणि रामलालजी घुणावत व मंगला घुणावत यांच्या स्मरणार्थ, या वर्षापासून ‘रानगंध’ हा पुरस्कार सुरू करण्यात आला आहे. पहिला पुरस्कार औरंगाबाद येथील कवयित्री अनुराधा पाटील यांना देण्यात येणार आहे. येत्या १६ सप्टेंबर रोजी महानोर यांच्या जन्मदिनी पळसखेड येथे प्रसिद्ध लेखक श्याम मनोहर यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे’, अशी माहिती रानगंध पुरस्कार समितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. 

अनुराधा पाटील गेली ४५ वर्षे काव्य लेखन करत असून, त्यांचे पाच कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत. ‘कदाचित अजूनही’ हा त्यांचा पाचवा कवितासंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे. आशयगर्भ आणि विचारप्रवण कविता हे अनुराधा पाटील यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य आहे. १९७० नंतर मराठी साहित्यात लक्षणीय भर घालणाऱ्या राजन गवस, नारायण कुलकर्णी कवठेकर, प्रेमानंद गज्वी, अनुराधा पाटील यांच्या साहित्याचा विचार करून परीक्षक समितीने अनुराधा पाटील यांची या पुरस्कारासाठी निवड केली. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link