Next
‘जॉयस्टर’कडून ग्रामीण भागात मोफत वाय-फाय
प्रेस रिलीज
Friday, May 04 | 12:38 PM
15 0 0
Share this story

मुंबई : अग्रणी ब्रॉडबॅंड आणि इंटरनेट सेवा पुरवठादार कंपनी जॉयस्टर इन्फोसव्‍‌र्ह प्रायव्हेट लिमिटेडने (पूर्वाश्रमीची सिस्कॉन इन्फोवे) आता महाराष्ट्राच्या ग्रामीण भाग आणि गोव्यात आपल्या मोफत इंटरनेट वाय-फाय सुविधेचा विस्तार सुरू केला आहे. २००५ साली स्थापित ‘जॉयस्टर’द्वारे सध्या मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबईसारख्या जिल्ह्यांतील मुख्य सार्वजनिक ठिकाणांवर २४ तास मोफत वाय-फाय सेवा दिली जात आहे.

गुगलकडून रेल्वे स्थानकांवर मोफत वाय-फाय सेवा सुरू केल्या जाण्याआधी ‘जॉयस्टर’ने आपली सेवा राज्यातील सार्वजनिक ठिकाणांवर सुरू केली आहे. मोठ्या शहरातच नव्हे, तर कोकण रेल्वेची सर्व स्थानके, पोलीस आयुक्तालय आणि मुख्यालयांवर अनेक वर्षांपासून ही सेवा अविरत सुरू आहे. कंपनीने प्रदान केलेल्या वाय-फाय हॉटस्पॉटद्वारे नियमित सेवा उपभोगणारे सध्या २३ लाख नोंदणीकृत ग्राहक आहेत.

‘जॉयस्टरचे हॉटस्पॉट आता कोलाड, माणगाव, दिवाणखावटी, खेड, चिपळूण, कमाठे, रत्नागिरी, राजापूर, नांदगाव आणि सावंतवाडी रेल्वे स्थानक परिसरासह गोव्यापर्यंत विस्तारण्यात आले आहेत,’ अशी माहिती कंपनीचे अध्यक्ष निकुंज कंपानी यांनी दिली. येत्या काही महिन्यांत राज्याच्या ग्रामीण अंतर्भागात विस्ताराची योजना असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

९००हून अधिक कर्मचारी असलेल्या या कंपनीने आर्थिक वर्षांत ५०० कोटी रुपयांचे नक्त मूल्य असलेल्या कंपन्यांच्या पंक्तीत स्थान मिळविण्याचे लक्ष्य राखले असल्याचे कंपानी यांनी सांगितले. ‘भारताला डिजिटलसमर्थ ज्ञानाधारित अर्थव्यवस्थेत परिवर्तित करण्याच्या लक्ष्याने प्रेरित आपला कर्मचारी वर्ग हे उद्दिष्ट सहज पार करेल,’ असे ते म्हणाले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link