Next
भिवंडीतील आश्रमशाळेला आयएसओ मानांकन
BOI
Saturday, January 19, 2019 | 03:54 PM
15 0 0
Share this story



भिवंडी : तालुक्यातील मौजे चिंबीपाडा येथील शासकीय आश्रमशाळेला सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षात आयएसओ मानांकन प्राप्त झाल्याने परिसरात उत्साहाचे वातावरण पसरले आहे.

राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा यांच्या संकल्पनेतून राज्यभरातील आदिवासी विकास विभागात कायापालट अभियान हाती घेण्यात आले आहे. त्यानुसार ठाण्याच्या अपर आयुक्त आदिवासी विकास विभागांतर्गत शहापूर एकात्मिक आदिवासी प्रकल्पातील शासकीय आश्रमशाळा चिंबीपाडा येथे कायापालट अभियान राबवण्यात आले. त्यामध्ये शालेय परिसर स्वच्छता, शालेय सजावट, बाग-बगीचे, शाळा रंगरंगोटी, हॅंडवॉश, वर्ग सजावट, क्रीडा स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी, शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा गेले चार वर्षे १०० टक्के निकाल असे विविध नाविन्यपूर्ण उपक्रम शालेय स्तरावर राबवण्यात आले. त्याची दखल उच्च स्तरावर घेऊन आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे.

‘शाळेला आयएसओ प्राप्त झाल्याने चिंबीपाडा या दुर्गम भागातील आश्रमशाळा जागतिक स्तरावर पोहचली आहे. त्यामुळे येथील शिक्षण क्षेत्रातून शालेय प्रशासनाचे कौतुक होत आहे. चिंबीपाडा शासकीय आश्रमशाळेच्या आयएसओ मानांकन प्राप्तीसाठी आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा, अपर आयुक्त संजय मीना, प्रकल्प अधिकारी अरुणकुमार जाधव, मंत्रालयीन समन्वयक जगदीश पाटील, शिक्षण विभाग सहाय्यक प्रकल्प अधिकारी विजय भडगांवकर, शालेय समिती अध्यक्ष चंद्रकांत जाधव तसेच सर्व शिक्षक आदींचे विशेष सहकार्य लाभले,’ अशी प्रतिक्रिया मुख्याध्यापक अशोक अहिरे यांनी व्यक्त केली.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link