Next
‘दालमिया’तर्फे ‘क्राफ्ट बेटन कलेक्शन २०१८’
प्रेस रिलीज
Friday, April 20, 2018 | 01:57 PM
15 0 0
Share this storyपुणे : नेहमीच आपल्या अभिनवतेसाठी ओळखले जाणारी दालमिया सिमेंट या कंपनीने पुण्यात गोल्फ कोर्स येथे २२ एप्रिलपर्यंत सुरू असलेल्या क्रिएटीसिटी फेस्टिवलमध्ये ‘क्राफ्ट बेटन कलेक्शन २०१८’ प्रदर्शित केले आहे. ‘क्राफ्ट बेटन’मध्ये घरांसाठी डिझायनर सिमेंट क्रिएशन्सचा समावेश आहे.

‘क्राफ्ट बेटन’ने एप्रिल २०१७मध्ये सादर केलेल्या आपल्या पहिल्या पर्वातून सिमेंटकडे वापराच्या दृष्टीकोनात बदल घडवून आणला आहे. या अगोदर हे प्रदर्शन गोवा, मुंबई आणि दिल्ली येथे भरविण्यात आले होते. या प्रदर्शनामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक कमावलेल्या डिझाइनर्सने तयार केलेल्या ४८ उच्च प्रतीची उत्पादने सादर केली आहेत. त्यामध्ये जीवनशैली, दागिने ते घरगुती उत्पादने आणि फर्निचर यांचा देखील समावेश आहे.

‘क्राफ्ट बेटन कलेक्शन २०१८’मध्ये इति त्यागी (भारत), सोमेश सिंग (भारत), सिंथिया मिजरेस रॉड्रिग्स (मेक्सिको), अ‍ॅलन सागा (मेक्सिको) आणि मिरोस्लॅ बाका (पोलंड) यांच्या कलाकृती पाहायला मिळणार असून, त्यांनी सिमेंटचे नैसर्गिक फायदे शोधून एक नवीन मापदंड स्थापित केला आहे. या उत्पादनांमध्ये जगातील हरित सिमेंटचा नवीन पोत, रंग, घनता आणि दृढता पाहायला मिळणार आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link