Next
पु. ना. गाडगीळ आणि सन्स आता उस्मानाबादमध्ये
प्रेस रिलीज
Wednesday, March 14, 2018 | 04:00 PM
15 0 0
Share this story

उस्मानाबादमधील पु. ना. गाडगीळ आणि सन्स लि. च्या दालनाचे उद्घाटन रंगनाथ कुलकर्णी, शैलेंद्र धुरगुडे व शालिनीताई ओक यांच्या हस्ते झाले. या वेळी अजित गाडगीळ, अमित मोडक, सतीश कुबेर, श्रीकांत कुबेर, नंदू देवळे, सुनील पाठक, प्रफुल्ल वाघ आदी.

उस्मानाबाद : तब्बल १८६ वर्षांची परंपरा असलेल्या आणि सोने-चांदी व हिरे दागिन्यांच्या व्यवसायातील देशातील आघाडीचा व विश्वासार्ह ब्रँड पु. ना. गाडगीळ आणि सन्स लिमिटेडच्या उस्मानाबादमधील दालनाचे उद्घाटन रंगनाथ कुलकर्णी, शैलेंद्र धुरगुडे व शालिनीताई ओक यांच्या हस्ते बुधवारी झाले. या वेळी पु. ना. गाडगीळ आणि सन्स लि.चे अजित गाडगीळ, अमित मोडक, सतीश कुबेर, श्रीकांत कुबेर, नंदू देवळे, सुनील पाठक, प्रफुल्ल वाघ, आदित्य मोडक, राहुल शेवकरी, जितेंद्र जोशी, वृजेंद्र वाघचौरे व आनंदसुगंधी यांच्यासह दुकानाच्या व्यवस्थापिका योगिता शिंदे उपस्थित होत्या.

हे भव्य दालन पोलिस लाईनसमोरील सन अँड ओशन कॉम्प्लेक्स येथे असून, उस्मानाबादबरोबर आजूबाजूच्या गावांतील ग्राहकांना याचा लाभ घेता येणार आहे. या ठिकाणी पार्किंगची भरपूर सुविधा आहे. पु. ना. गाडगीळ आणि सन्सचे हे २५ वे दालन आहे.

या संदर्भात पु. ना. गाडगीळ आणि सन्स लिमिटेडचे अजित गाडगीळ म्हणाले, ‘उस्मानाबाद ही दागिन्यांची महत्त्वाची बाजारपेठ असून, ती वाढत आहे. त्यामुळेच ग्राहकांच्या आग्रहानुसार आम्ही येथे दालन सुरू केले आहे. दागिन्यांच्या असंख्य व्हरायटीसाठी पु. ना. गाडगीळ आणि सन्स ओळखले जातात. त्यामुळेच ग्राहकांना सोने-चांदी व हिऱ्यांच्या दागिन्यांच्या असंख्य व्हरायटी येथे उपलब्ध आहेत. डायमंड ज्वेलरी, टेम्पल ज्वेलरी, रोझ गोल्ड, बाजीराव मस्तानी, लँटर्न कलेक्शन, लाइटवेट ज्वेलरीबरोबर चांदीचे दागिने व भेटवस्तूंच्या असंख्य व्हरायटी येथे आहेत.’

‘पुणे-मुंबईबरोबर एकाचवेळी येथेही सोने-हीरे व चांदीच्या दागिन्यांची कलेक्शन्स उपलब्ध आहेत. सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी योजनाही उपलब्ध आहेत,’ असे पु. ना. गाडगीळ आणि सन्स लिमिटेडचे विक्री प्रमुख सतीश कुबेर यांनी सांगितले.

‘उस्मानाबादबरोबरच जळगाव, वर्धा व परभणी येथे नुकतीच दालने सुरू झाली आहेत. त्यामुळे महाराष्ट्र, गुजरात व कर्नाटक ही तीन राज्ये मिळून पु. ना. गाडगीळ आणि सन्सच्या दालनांची संख्या २५ वर गेली असून, पु. ना. गाडगीळ समूहातील दागिन्यांची महाराष्ट्रात सर्वाधिक दालने असणारी संस्था पु. ना. गाडगीळ आणि सन्स बनली आहे,’  असे पु. ना. गाडगीळ आणि सन्स लिमिटेडचे सीईओ अमित मोडक यांनी सांगितले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link