Next
‘शिक्षणातून प्रामाणिकपणा, संवेदनशीलतेचा विकास होण्याची गरज’
अतुल जोग यांचे प्रतिपादन
BOI
Monday, January 14, 2019 | 11:24 AM
15 0 0
Share this article:

कार्यक्रमात बोलताना वनवासी कल्याण आश्रमाचे अखिल भारतीय संघटनमंत्री अतुल जोग.

रत्नागिरी :
‘शिक्षणातून प्रामाणिकपणा व संवेदनशीलता या गोष्टींचा विकास होण्याची गरज आहे. त्या दृष्टीने शिक्षकांनी शिक्षण दिले पाहिजे,’ असे मत वनवासी कल्याण आश्रमाचे अखिल भारतीय संघटनमंत्री अतुल जोग यांनी व्यक्त केले. रत्नागिरीतील भारत शिक्षण मंडळाच्या कला, वाणिज्य, विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयाचे नामकरण स्वातंत्र्यसैनिक आत्माराम गोपाळ देव कला, अॅड. श्रीनिवास भार्गवराम घैसास वाणिज्य आणि श्रीमान रमेश कीर विज्ञान महाविद्यालय असे करण्यात आले आहे. नामकरण आणि औपचारिक उद्घाटन सोहळा १२ जानेवारी २०१९ रोजी जोग यांच्या हस्ते झाला.

खेळाच्या मैदानासाठी सव्वा लाख रुपयांची देणगी जाहीर करणारे उल्हास लांजेकर, जागामालक रजनी कोतवडेकर, मनोहर कोतवडेकर, ग्रंथालय देणगीदार वैजयंती फणसेकर, शशांक गांधी आदींचा सत्कार करण्यात आला. निवृत्त एअर मार्शल हेमंत भागवत, राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान संचालक डॉ. विजय जोशी, आमदार उदय सामंत, नगराध्यक्ष राहुल पंडित, देणगीदार रमेश कीर, नमिता कीर, अॅड. श्रीनिवास घैसास, भार्गवराम घैसास, प्रा. रमेश देव, वृषाली देव, डॉ. सुभाष देव, सुखदा देव, मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार साळवी, कार्याध्यक्ष दिनकर पटवर्धन, प्राचार्य नीलोफर बन्नीकोप, कार्यवाह सुनील वणजू आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.

‘तंत्रज्ञान प्रगत होत चालले आहे. त्यामुळे वर्गखोल्यांची रचना प्रगत तंत्रज्ञानानुसार असावी,’ असे प्रतिपादन डॉ. विजय जोशी यांनी केले.

डॉ. देव यांनी अरुअप्पा जोशी यांच्या आठवणी सांगितल्या. ‘शिक्षण संस्थेला देणगी द्यायची असेल, तर ती कष्टाने मिळवलेल्या पैशांतून द्यावी. या महाविद्यालयाच्या नॅक अॅक्रिडेशनची जबाबदारी घेतली. अनुदानित कॉलेजमध्ये आर्थिक अहंकार असून, विनाअनुदानित कॉलेजमध्ये शिक्षक जीव ओतून काम करतात, हा चिंतनाचा विषय आहे,’ असे डॉ. सुभाष देव म्हणाले. 

‘रत्नागिरी हे शैक्षणिक दिग्गजांचे केंद्र असून, कोकणातील विद्यार्थ्यांना संधी मिळाली तर ते सोने करतात असे सांगितले. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी कोकण विभागीय मंडळास मान्यता दिली आणि गेली सात वर्षे महाराष्ट्रात दहावी, बारावी परीक्षेत कोकण मंडळाचा निकाल सर्वाधिक लागतो आहे. देशमुख यांनी खेळाच्या मैदानासाठी स्थगिती दिली. त्यानंतर हा भूखंड शाळेला मिळाला,’ असे कीर म्हणाले. 

‘रत्नागिरीनेच मला मोठे केले,’ असे अॅड. घैसास यांनी कृतज्ञतापूर्वक सांगितले.आमदार सामंत यांनी स्थानिक विकास निधीतून रंगमंच सुशोभीकरण करण्याची व खासदार विनायक राऊत यांच्या निधीतून दहा लाख रुपये लवकरात लवकर मिळवून देण्याची ग्वाही दिली.

प्रास्ताविकामध्ये कार्याध्यक्ष दिनकर पटवर्धन यांनी भारत शिक्षण मंडळ सुरू झाल्यापासून आतापर्यंतच्या कार्याचा आढावा घेतला. पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून प्रा. मानसी मुळ्ये यांच्या आवाजात महाविद्यालयाच्या दोन वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेतला. ‘पुढील २५ ते ३० वर्षांत महाविद्यालयाचा विकास झाला पाहिजे. माजी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाला मदत केली पाहिजे,’ असे आवाहन भारत शिक्षण मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार साळवी यांनी केले. प्रा. अनन्या धुंदूर, सहकार्यवाह विनय परांजपे यांनी सूत्रसंचालन केले. प्रभारी प्राचार्या नीलोफर बन्नीकोप यांनी आभार मानले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search