Next
‘ईद मिलन’ कार्यक्रमाला पुणेकरांचा प्रतिसाद
प्रेस रिलीज
Monday, June 10, 2019 | 01:36 PM
15 0 0
Share this article:


पुणे : आझम कॅम्पस शैक्षणिक परिवार आणि अवामी महाज या सामाजिक संघटनेतर्फे आठ जून २०१९ रोजी आझम कॅम्पस (पुणे कॅम्प) येथे ‘ईद मिलन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सर्वधर्मीय बांधवांनी सहभागी होत प्रतिसाद दिला. 

या कार्यक्रमात इकबाल दरबार यांचा ‘रुह’ हा सुफी संगीताचा बहारदार कार्यक्रम झाला. त्याला सिनेगीतांची आणि भजनाची जोड होती. सर्वांनी शिरखुर्मासह रुचकर भोजनाचा आस्वाद  घेतला. गुलाबपुष्पांची देवाणघेवाण करत एकमेकांच्या गळाभेटी घेऊन सर्वांनी ईदच्या शुभेच्छा दिल्या.

अवामी महाज संस्थेचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार, ‘एमसीई’ सोसायटी उपाध्यक्ष आबेदा इनामदार, सचिव लतीफ मगदूम, अवामी महाजचे सचिव वाहिद बियाबानी, शाहीद शेख यांनी स्वागत केले.


या प्रसंगी बिशप थॉमस डाबरे, ज्येष्ठ नेते उल्हास पवार, खासदार गिरीश बापट, सामाजिक कल्याण आणि अल्पसंख्यांक विकास राज्यमंत्री दिलीप कांबळे, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, मोहन जोशी, संतसिंग मोखा, अभय छाजेड, अन्वर राजन, रणजीत शिरोळे, परशुराम वाडेकर, महादेव बाबर, माजी महापौर प्रशांत जगताप, डॉ. सुहास परचुरे, डॉ. मुश्ताक मुकादम, नगरसेविका नंदा लोणकर आदी मान्यवर उपस्थित होते.

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search