Next
अनिल शिरोळेंच्या हस्ते बायोटॉयलेटचे उद्घाटन
प्रेस रिलीज
Thursday, October 04, 2018 | 12:40 PM
15 0 0
Share this article:



पुणे : ‘स्वच्छ रेल्वे, स्वच्छ भारत’ अभियानाअंतर्गत भारतीय रेल्वे आणि डिफेन्स रिसर्च अॅंड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (डीआरडीओ) यांच्या संयुक्त प्रयत्नाने पुण्याहून जमू-काश्मीरला जाणाऱ्या झेलम एक्स्प्रेसमध्ये बायोटॉयलेट्स बसविण्यात आले आहेत. रेल्वेच्या एकूण २४ कोचेसमधील या बायोटॉयलेट्सचे लोकार्पण पुण्याचे खासदार अनिल शिरोळे यांच्या हस्ते करण्यात आले.

या वेळी रेल्वेच्या पुणे विभागाचे व्यवस्थापक मिलिंद देऊस्कर, वरिष्ठ विभागीय व्यापारी व्यवस्थापक कृष्णा पाटील यांसह रेल्वेच्या पुणे विभागाचा अधिकारी उपस्थित होते.

या प्रसंगी बोलताना शिरोळे म्हणाले, ‘बायोटॉयलेट प्रणाली ही सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील संपूर्णत: सुरक्षित अशी प्रणाली असून, यामुळे रेल्वेचे डबे, रेल्वे ट्रॅक यांबरोबरच त्यांच्या आजूबाजूचा परिसर देखील स्वच्छ राहण्यास मोलाची मदत होणार आहे. भारतीय रेल्वेच्या पुणे विभागातर्फे या प्रणालीचे लोकार्पण होत असल्याचा आपल्याला आनंद होत आहे.’

या बायोटॉयलेट्सचे वापरण्यास सोपी, आरोग्यदायी असून, यामधील बॅक्टेरियाच्या मदतीने मानवी विष्ठेचे रूपांतर वायू आणि पाण्यात होऊन त्याचे क्लोरीनेशन होते. याचा फायदा पर्यावरण संरक्षणाला होणारच आहे. त्याचबरोबर ‘स्वच्छ भारत चळवळी’ला देखील याचा हातभार लागत आहे.

रेल्वे प्रशासनाने उपलब्ध करून दिलेल्या या आधुनिक बायोटॉयलेटचा वापर नागरिकांनी योग्यप्रकारे करण्याचे आवाहन शिरोळे यांनी या वेळी केले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search