Next
‘पुणे डिझाइन फेस्टिवल’चे आयोजन
BOI
Tuesday, January 08, 2019 | 03:13 PM
15 0 0
Share this story

पुणे : डिझाईन क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींनी एकत्र यावे आणि त्यांच्या कल्पकतेस चालना मिळावी, तसेच सामान्य नागरिकांनाही या क्षेत्राची ओळख व्हावी या उद्देशाने ‘असोसिएशन ऑफ डिझाईनर्स ऑफ इंडिया’च्या (एडीआय) पुणे शाखेतर्फे तेराव्या ‘पुणे डिझाईन फेस्टिव्हल’चे आयोजन करण्यात आले आहे.

 शुक्रवार,दि. ११ व शनिवार, दि. १२ जानेवारी रोजी हयात रिजन्सी येथे हा महोत्सव होणार असून, डिझाईन क्षेत्रातील उत्तम कामगिरीसाठी ‘कोलॅब’ अर्थात ‘सहयोगातून आविष्कार’’ ही यंदाच्या डिझाईन फेस्टिव्हलची प्रमुख संकल्पना आहे.  

दोन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात डिझाईन क्षेत्राशी संबंधित विविध विषयांवरील २२ व्याख्याने, सात कार्यशाळा, परिसंवाद, चित्रपट प्रदर्शन, पुरस्कार वितरण आदी कार्यक्रमांचा समावेश आहे. याशिवाय डिझाईनचे विद्यार्थी व त्यांच्या पालकांसाठी उपयोगी ठरतील अशा ‘डिझाईन एक्स्पो’ चे आणि ‘जेन डी’ या विशेष व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. 

बोलक्या बाहुल्यांचे कलाकार दादी पदमजी, लेखक संतोष देसाई, आंतरराष्ट्रीय स्तरावरील डिझायनर विल्यम हॅराल्ड वाँग, केविन गिल्बो, मॅगी मॅकनॅब, सामाजिक कार्यकर्ते गौतम करजगी यांची महोत्सवात प्रमुख उपस्थिती असणार आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link