Next
लालबहादूर शास्त्रींच्या मृत्यूचे रहस्य उलगडणार ‘द ताश्कंद फाईल्स’
लालबहादूर शास्त्रींच्या अकस्मात निधनाच्या घटनाक्रमांवर प्रकाश टाकणारा चित्रपट
BOI
Tuesday, March 26, 2019 | 06:00 PM
15 0 0
Share this article:


मुंबई : १९६६मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेला 'ताश्कंद अॅग्रिमेंट' हा शांतता करार आणि या करारानंतर तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचे झालेले अकस्मात निधन ही ऐतिहासिक घटना आजही अनेक प्रश्न निर्माण करते. याच घटनेवर आधारित ‘द ताश्कंद फाईल्स’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. येत्या १२ एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित होणार असून नुकताच त्याचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. 

नसरुद्दिन शाह, मिथून चक्रवर्ती, पल्लवी जोशी, मंदिरा बेदी, श्वेता बसू, विनय पाठक, पंकज त्रिपाठी, प्रकाश बेलवडी आणि अंकूर राठी अशी तगडी कलाकार मंडळी या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीने चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. चित्रपटात पल्लवी जोशी ‘आयशा अली शाह’, मंदिरा बेदी सामाजिक कार्यकर्त्या ‘इंदिरा जोसेफ रॉय’ यांच्या भूमिकेत, श्वेता बसू ‘रागिणी फुले’ यांच्या भूमिकेत तर श्यामसुंदर त्रिपाठींच्या भूमिकेत मिथन चक्रवर्ती दिसणार आहेत. 

लाल बहादूर शास्त्री१० जानेवारी १९६६मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात ‘ताश्कंद डिक्लरेशन’ म्हणजेच ‘ताश्कंद अॅग्रिमेंट’ हा शांतता करार झाला होता. तेव्हा लाल बहादूर शास्त्री हे भारताचे पंतप्रधान होते. त्यामुळे भारताच्या वतीने शास्त्री यांनी आणि तत्कालीन पाकिस्तानी अध्यक्ष अयुब खान यांनी या करारावर सह्या केल्या होत्या. या कराराची औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे ११ जानेवारी १९६६ला लाल बहादूर शास्त्री यांचे अकस्मात निधन झाले. हा करार, त्यांचा मृत्यू आणि नंतरच्या घडामोडी हा सगळा घटनाक्रम या चित्रपटात मांडण्यात आला आहे. या सगळ्याची झलक दाखवणारा ट्रेलर चित्रपटाविषयी बरेच काही सांगून जातो. 

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search