Next
बॅंकबाजारची डिजिटल फायनान्स सेवा १३०० शहरांमध्ये
प्रेस रिलीज
Thursday, May 24 | 02:09 PM
15 0 0
Share this story

बंगळूरू :  देशातील छोट्या व मध्यम स्वरुपाच्या शहरांतील नागरिकांचा बॅंकबाजारला मिळणाऱ्या प्रतिसादात गेल्या दोन वर्षांमध्ये तब्बल सहा पटींनी वाढ झाली आहे. मोबाइल फोनवरून इंटरनेटच्या सहाय्याने बॅंकबाजारची वेबसाईट पाहणाऱ्यांची संख्या वाढल्याचे दिसून आले आहे. २०१६ मध्ये अशा मोबाइल ग्राहकांची संख्या ५० टक्के होती, ती सध्या ७० टक्के इतकी झाली आहे, असे बॅंकबाजारने एका अहवालात म्हटले आहे.

२०१६-१७ च्या चौथ्या तिमाहीमध्ये बॅंकबाजारच्या वेबसाईटला भेट देणाऱ्या दर्शकांमध्ये पर्सनल फायनान्सशी संबंधित माहिती मिळवणाऱ्यांचे प्रमाण जास्त होते. नोटबंदीनंतर याच तिमाहीच्या काळात, छोट्या व मध्यम शहरांतील दर्शकांनी बॅंकबाजारच्या वेबसाईटला या कामासाठी भेट दिल्याचे प्रमाण ८६ टक्क्यांनी वाढले. पर्सनल फायनान्ससंबंधी माहिती घेणाऱ्यांची संख्या या शहरांमध्ये २०१६ मध्ये २६ टक्के होती, ती २०१८ मध्ये ४३ टक्के झाली. आग्रा, विशाखापट्टणम, दिब्रुगढ, सिलिगुडी, भटिंडा, औरंगाबाद, धनबाद यांचा या शहरांमध्ये समावेश होतो. 

याबाबत बॅंकबाजारचे सहसंस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी अधिल शेट्टी म्हणाले, ‘भारताच्या डिजिटल प्रवासात आम्ही एक आशादायी असे चित्र उभे करीत असल्याचा आम्हाला आनंद वाटतो. छोट्या व मध्यम शहरांमधून आम्हाला प्रतिसाद वाढत असल्याने देशात डिजिटलायझेशन व त्याद्वारे अर्थ सेवा मिळवणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचेही दिसून येते. ही अर्थ सेवा नागरिकांच्या अक्षरशः हाताच्या बोटांपर्यत पोहोचल्याचे लक्षात येते. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने नवीन प्रकारच्या बॅंकिंग सुविधा मिळवण्याकडे नागरिकांचा कल वाढत असल्याने, त्यांना जलद, प्रभावी व नावीन्यपूर्ण सेवा देण्यास आमच्यासारख्या कंपन्यांना संधी मिळते आहे. बॅंकबाजारने बॅंकांची उत्पादने पेपरलेस पध्दतीने लोकांपर्यंत नेल्याने; तसेच छोट्या स्वरुपाची कर्जे एका दिवसांत मंजूर करण्याची कार्यक्षमता दाखवल्याने लोकांनीही बॅंकबाजारला भरभरून प्रतिसाद दिला आहे. अर्थविषयक उत्पादनांच्या व्यवहारांत कूपन्सची योजना बॅंकबाजारने आखल्याने, नागरिकांनाही शॉपिंग करताना जसा आनंद मिळतो, तसा मिळवता आला. तेही एक मोठे आकर्षण ठरले.’

‘छोट्या व मध्यम शहरांतून चांगला प्रतिसाद मिळाल्यानेच बॅंकबाजारच्या एकूण ग्राहकांच्या संख्येत मोठी वाढ झाली. २०१६ ते २०१८ या कालावधीत वेबसाईटला भेट देणाऱ्या दर्शकांची संख्या ३५० टक्क्यांनी वाढली. २०१६-१७च्या अंतिम तिमाहीत ही संख्या तब्बल ५२ टक्क्यांनी वाढली. या गतीने प्रतिसाद वाढत राहिल्यास, २०१८-१९ हे आर्थिक वर्ष संपेपर्यंत बॅंकबाजारच्या दर्शकांची संख्या ४० कोटींपर्यंत जाईल’, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

बॅंकबाजार ही कंपनी वेबसाईटच्या माध्यमातून ८५ हून अधिक बॅंकांची सेवा व माहिती नागरिकांना पुरवते. यात मोठ्या सार्वजनिक बॅंका, खासगी बॅंका, बॅंकेतर अर्थसंस्था व विमा कंपन्यांचा समावेश होतो. डिसेंबर २०१७ ते फेब्रुवारी २०१८ या तीन महिन्यांमध्ये बॅंकबाजारच्या वेबसाईटला सुमारे नऊ कोटी दर्शकांनी भेटी दिल्या. अॅमझॉन डॉट कॉम, एक्स्पेरिन, फिडेलिटी ग्रोथ पार्टनर्स, मूज पार्टनर्स, सेक्विया कॅपिटल, वॉल्डन इंटरनॅशनल या कंपन्यांनी बॅंकबाजारमध्ये ११ कोटी डॉलर्सची गुंतवणूक केलेली आहे. बॅंकबाजार डॉट कॉम ही अर्थसेवा क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट वेबसाईट असल्याचा निर्वाळा इंटरनेट अॅंड मोबाइल असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेने दिला आहे. बॅंकबाजार हा आशियातील उत्कृष्ट ब्रॅंड असल्याचे प्रमाणपत्र सीएमओ एशिया या संस्थेने दिले आहे. कर्ज, क्रेडिट कार्ड व इतर आर्थिक उत्पादने योग्य दरांमध्ये त्वरीत पुरविणारी बॅंकबाजार डॉट कॉम ही भारतातील पहिली ऑनलाईन बाजारपेठ आहे. कर्ज मिळवण्याची किचकट प्रक्रिया या ठिकाणी अत्यंत सुलभ स्वरुपात सादर केली जाते. बॅंकबाजारच्या सेवा वेबपोर्टल, मोबाईल इंटरनेट व अॅप या स्वरुपात उपलब्ध आहेत. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link